Join us  

IPL 2024: मोठी बातमी! मराठमोळा ऋतुराज CSK चा नवा कर्णधार; धोनीनेच सोपवली जबाबदारी

Ruturaj Gaikwad IPL: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 3:47 PM

Open in App

IPL 2024: चेन्नईच्या संघाने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. (MS Dhoni) महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात सीएसकेचा कर्णधार नसणार आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड प्रथमच (Ruturaj Gaikwad New Captain Of CSK) आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलचे पाच किताब जिंकले आहेत. मागील हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला नमवून धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली. (CSK New Team) 

लक्षणीय बाब म्हणजे महेंद्रसिंग धोनीनेच ऋतुराज गायकवाडवर ही जबाबदारी सोपवली आहे. चेन्नईच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली. कोणतीही पूर्वकल्पना नसताना धोनीने नेहमीप्रमाणे अचानक मोठा निर्णय जाहीर केला. खरं तर धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता तेव्हा देखील याच पद्धतीने अचानक निर्णय घेऊन माहीने चाहत्यांना धक्का दिला होता. आता धोनीने कर्णधारपद सोडल्यामुळे तो यंदा आयपीएलमधून निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे.  

 

दरम्यान, यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

IPL 2024 वेळापत्रक

  1. २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  2. २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  3. २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  4. २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  5. २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  6. २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  7. २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  8. २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  10. २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  11. ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  12. ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  13. ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  14. १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  15. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  16. ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  17. ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  18. ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  19. ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  20. ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :ऋतुराज गायकवाडमहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४