Join us

IPL 2024: कोलकाता- राजस्थान, गुजरात- दिल्ली सामन्यांच्या तारखांत बदल

IPL 2024: आयपीएल १७ मधील आधीच्या वेळापत्रकातील  दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बीसीसीआयने बदल केला आहे. कोलकाता आणि राजस्थान  यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, तो आता १६ एप्रिल  रोजी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 05:37 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल १७ मधील आधीच्या वेळापत्रकातील  दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बीसीसीआयने बदल केला आहे. कोलकाता आणि राजस्थान  यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, तो आता १६ एप्रिल  रोजी होणार आहे.

याशिवाय गुजरात आणि दिल्ली  यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, तो आता १७ एप्रिल रोजी खेळविला जाईल. बोर्डाने यामागील ठोस कारण मात्र दिलेले नाही. कोलकाता पोलिसांनी स्थानिक तीन सामन्यांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दर्शविली होती. कॅबचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांना पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात रामनवमी आणि सार्वत्रिक निवडणुकीमुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण असल्याचे कारण दिले. कॅबने बीसीसीआयला कळविल्यानंतर बोर्डाने कोलकाताचा सामना एक दिवस आधी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग