Join us  

6, 4, 4, 6, 4, 4 ... Phil Salt चा 'रूद्रावतार', फर्ग्युसनची धुलाई, एका षटकांत ठोकल्या २८ धावा (Video)

Phil Salt Lockie Ferguson Video, IPL 2024 KKR vs RCB: फर्ग्युसनच्या पहिल्या ओव्हरमध्ये सॉल्टने त्याला चोप दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 4:25 PM

Open in App

Phil Salt Lockie Ferguson Video, IPL KKR vs RCB: कोलकाता विरूद्धच्या सामन्यात बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय पहिल्या ३ षटकांपर्यंत योग्य ठरल्याचे दिसले. पण चौथ्या षटकात मात्र एक तुफान आलं. फिल सॉल्ट हा नेहमीच आपल्या धडाकेबाज फलंदाजी साठी ओळखला जातो. त्याने या सामन्यातही आपल्या फटकेबाजीची चुणून दाखवून दिली. फिल सॉल्टने एका षटकात लॉकी फर्ग्युसनला तब्बल २८ धावा ठोकल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, आधीत्या ३ षटकात मिळून कोलकाताच्या सलामीवीरांना केवळ २७ धावा करता आल्या होत्या. पण चौथ्या क्रमांकाच्या एका षटकात त्यांनी आधीच्या ३ षटकांपेक्षा जास्त धावा कुटल्या.

पहिल्या तीन षटकात बंगळुरूच्या चे गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत केवळ 27 धावा दिल्या ह्यात मोहम्मद सिराज ने दोन तर यश दयालने एक शतक टाकले होते चौथ्या शतकात बदल म्हणून लौकी फर्ग्युसन गोलंदाजीसाठी आला त्याच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्ट ने बाउन्सर वर षटकार मारला त्यानंतर दोन सलग चौकार गेले चौथ्या चेंडूवर पुन्हा एक तुंग असा षटकार खेचण्यात आला त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारून सॉल्ट ने तब्बल 28 धावांची कमाई केली.

सॉल्टचा हा रुद्रावतार फार काळ टिकू शकला नाही पुढच्याच म्हणजेच पाचव्या शतकात सिराज पुन्हा गोलंदाजीसाठी आला त्याने पहिल्या चेंडूवर नारायणला एकेरी धाव घेण्यास भाग पाडले तर दुसऱ्या चेंडूवर सॉल्ट ला रजत पाटीदार करवी झेलबाद केले. सॉल्ट ने 342 च्या स्ट्राइक रेटने 14 चेंडू सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 48 धावा कुटल्या.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोशल मीडिया