Join us  

कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट'

Shreyas Iyer Ramandeep Singh Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: बंगळुरूच्या गोलंदाजांना ८ पैकी चौथ्यांदा २०० पार धावांचे आव्हान मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 5:43 PM

Open in App

Shreyas Iyer Ramandeep Singh Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: कोलकाताच्या संघाने आपल्या फलंदाजांच्या तुफानी फॉर्मच्या वादळात पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला झोडपून काढले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २२२ धावांपर्यंत मजल मारली. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याशिवाय फिल सॉल्टने ३४२च्या स्ट्राइक रेटने ४८ धावा तर रमणदीप सिंगने २६६च्या स्ट्राइक रेटने नाबाद २४ धावा करून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. यंदाच्या हंगामात आज आपला आठवा सामना खेळणाऱ्या RCB ने चार सामन्यात २००हून अधिक धावा दिल्या.

प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या तीन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण चौथ्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात झाली. सलामीवीर फिल सॉल्ट १४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. सुनील नारायण १०, अंगक्रिश रघुवंशी ३, वेंकटेश अय्यर १६ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि आंद्र रसेल यांच्या चांगली भागीदारी झाली. श्रेयसने ३६ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार खेचत ५० धावा केल्या. रिंकू सिंगने १६ चेंडूत २४, आंद्रे रसेलने २० चेंडूत नाबाद २७, रमणदीप सिंगने ९ चेंडूत नाबाद २४ धावा करून छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळेच कोलकाताला २० षटकांत ६ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारता आली.

बंगळुरूकडून कॅमेरॉन ग्रीनने ३५ धावांत २ बळी आणि यश दयालने ५६ धावांत २ बळी टिपले. मोहम्मद सिराजला ४० धावांत १ बळी तर लॉकी फर्ग्युसनला ४७ धावांत १ बळी टिपता आला. कर्ण शर्माने ४ षटकांत केवळ ३३ धावाच दिल्या पण त्याला बळी मिळवता आला नाही.

  • कोलकाताचा संघ- फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा (इम्पॅक्ट खेळाडू- सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज)
  • बंगळुरूचा संघ-विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल (इम्पॅक्ट खेळाडू- सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, वैज्ञानिक विजयकुमार, स्वप्नील सिंग)
टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यररॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली