IPL 2024, SRH vs GT Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांनी प्ले ऑफमधील आपली जागा पक्की केली आहे, तर KKR ने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील स्थानही निश्चित केलं आहे. RR ला कालचा सामना जिंकून क्वालिफायर १ च्या दिशेने कूच करण्याची संधी होती, परंतु आता सनरायझर्स हैदराबादही या शर्यतीत आले आहेत. पण, SRH च्या मार्गात पावसाने खोडा घातलेला पाहायला मिळतोय. SRH आज घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा सामना करणार आहेत. GT चे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे.
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
SRH vs GT लढतीवर पावसाचे सावट आले आहे. हैदराबाद येथे सध्या सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उप्पल स्टेडियमची खेळपट्टी झाकण्यात आली आहे. KKR vs GT यांच्यातला अहमदाबाद येथील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता आणि त्यामुळे गुजरातचे आव्हान संपुष्टात आले होते. पण, १ गुणामुळे KKR ने क्वालिफायर १ मधील आपली जागा निश्चित केली. गुजरात १३ सामन्यांत ११ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना शेवटच्या लीग सामन्यात जिंकून स्पर्धेचा सकारात्मक निरोप घ्यायचा आहे. मात्र, अहमदाबादच्या लढतीप्रमाणेच हैदराबाद येथेही त्यांच्या मार्गात पाऊस उभा आहे.
या सामन्यातील निकालाचा गुजरातला फार फरक पडणार नसला तरी हा सामना होणे व तो जिंकणे हे SRH साठी महत्त्वाचे आहे. हैदराबाद १२ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह क्वालिफायर १ साठी दावा सांगण्याची संधी आहे. पण, सद्यपरिस्थिती पाहता SRH vs GT सामना होणे अवघड आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागेल. असे झाल्यास
गुजरात टायटन्स १४ सामन्यांत १२ गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतील, तर
सनरायझर्स हैदराबाद १३ सामन्यांत १५ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. या परिस्थितीत हैदराबादचे प्ले ऑफचे तिकीटही निश्चित होईल.
चेन्नई सुपर किंग्स जे १३ सामन्यांत १४ गुणांवर आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जे १३ सामन्यांत १२ गुणांवर आहेत, त्यांच्यातल्या लढतीतील विजेता प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरेल. मात्र, RCB ला सामना नेट रन रेटच्या दृष्टीने एकतर १८ धावांनी किंवा १८.१ षटकांत जिंकावा लागेल. CSK चा नेट रन रेट हा ०.५२८ असा आणि त्यांना मागे टाकण्यासाठी RCB ला ( ०.३८७) गणित जुळवावे लागेल.