'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा

कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:13 PM2024-04-04T21:13:22+5:302024-04-04T21:15:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill  score 89* (48) with 6 fours and 4 sixes against PBKS, set 200 runs target | 'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा

'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - कर्णधार शुबमन गिलने ( Shubman Gill)  पुन्हा एकदा दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या. केन विलियम्सनने चांगला खेळ केला, परंतु त्याचा वेग काहीसा संथ राहिला. पण, साई सुदर्शनने ही उणीव भरून काढताना ताबडतोड फटके खेचले आणि पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना हैराण केले. राहुल तेवाटीयाने अखेरच्या षटकांत चांगले फेटके खेचले. 

गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 


कागिसो रबाडा हा पुन्हा एकदा गुजरात टायटन्ससाठी धोकादायक ठरला. त्याने वृद्धीमान सहा ( ११) ला माघारी पाठवले. गिल व केन यांनी डाव सावरला, परंतु त्यांच्या धावांचा वेग हवा तसा नव्हता. हरप्रीत ब्रारने ४० धावांची ही भागीदारी केनला ( २६) बाद करून तोडली. मात्र, साई सुदर्शनने GT च्या धावांचा वेग वाढवला आणि त्याने सिकंदर रझाचा चांगलाच समाचार घेतला. साई १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावांवर झेलबाद झाला. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने ३००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये शुबमनने आज दुसरे स्थान पटकावले.लोकेश राहुलने ८० इनिंग्जमध्ये हा पल्ला पार केला होता, तर गिलला ९२ इनिंग्ज खेळाव्या लागल्या.  
 


GT कडून १५०० हून अधिक धावा करणारा गिल पहिला फलंदाज ठरला. यानंतर हार्दिक पांड्या ( ८३३), डेव्हिड मिलर ( ८१७) यांचा क्रम येतो. गिलचे मांडीचे स्नायू ताणलेले दिसले आणि त्याला प्राथमिक उपचार घ्यावा लागला. GT साठी ५० सिक्स खेचणाराही तो पहिला फलंदाज ठरला. त्याने कागिसो रबाडाला खणखणीत षटकार खेचून हा पराक्रम केला. विजय शंकर ( ८) पुन्हा अपयशी ठरला आणि रबाडाने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. शुबमनने ८७वी धाव काढताच यंदाच्या पर्वातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद त्याच्या नावावर झाली.  गुजरातने ४ बाद १९९ धावा उभ्या केल्या. राहुलने ८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या, तर शुबमन ४८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ८९ धावा केल्या. 

Image

Web Title: IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill  score 89* (48) with 6 fours and 4 sixes against PBKS, set 200 runs target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.