Join us

IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: गुजरात टायटन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 18:36 IST

Open in App

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi | अहमदाबाद : गुजरात टायटन्सने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीकडून किंग कोहलीने शानदार खेळी केली. ऑरेंज कॅप डोक्यावर असलेल्या विराटने संथ खेळीवरून लक्ष्य करणाऱ्यांना या खेळीतून प्रत्युत्तर दिले. साई सुदर्शन आणि शाहरूख खान या युवा भारतीय शिलेदारांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीला तगडे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा सलामीवीर विराटने स्फोटक खेळी केली. (IPL 2024 News) 

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४५ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून यजमान गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमानांनी सावध खेळी करत डाव सावरला. शाहरूख खान आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी खेळी करून आरसीबीला चोख प्रत्युत्तर दिले.

विराटने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. यंदाच्या हंगामात त्याने पाचवेळा ५० हून अधिक धावा करण्याची किमया साधली. विराटच्या या खेळीचा दाखला देत माजी खेळाडू इरफान पठाणने एक बोलकी पोस्ट केली. तो म्हणाला की, विराट कोहलीच्या खराब स्ट्राईक रेटबद्दल लोक बोलत असतात. पण ऑरेंज कॅप डोक्यावर असताना देखील तो १५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो आहे हे अद्भुतच आहे. 

तत्पुर्वी, गुजरातकडून वृद्धिमान साहा (५), शुबमन गिल (१६) आणि शाहरूख खानने (५८) धावा केल्या, तर साई सुदर्शन (नाबाद ८४ धावा) आणि डेव्हिड मिलरने नाबाद २६ धावा केल्या. अखेर गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०० धावा केल्या. सुदर्शनने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ८४ धावांची अप्रतिम खेळी केली. 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सइरफान पठाण