Join us

IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: आज गुजरात आणि बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 16:57 IST

Open in App

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi | अहमदाबाद : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४५ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून यजमान गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमानांनी सावध खेळी करत डाव सावरला. शाहरूख खान आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी खेळी करून आरसीबीला चोख प्रत्युत्तर दिले. शाहरूखला आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक झळकावण्यात यश आले. त्याने ३० चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी केली. (IPL 2024 News) 

कर्णधार शुबमन गिल आणि वृद्धीमान साहा स्वस्तात बाद झाल्यानंतर सुदर्शन आणि शाहरूख यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही स्फोटक खेळी करत पाहुण्या संघाला घाम फोडला. शाहरूखने ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५८ धावा कुटल्या. पण, त्याला मोहम्मद सिराजच्या अप्रतिम चेंडूमुळे या खेळीच्या मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.

सिराजने आपल्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शाहरूखचा त्रिफळा काढला आणि यजमान संघाला तिसरा झटका दिला. सिराजचा यॉर्कर आरसीबीला मोठा दिलासा देऊन गेला. कारण घातक वाटणारा शाहरूख पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. 

गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, शाहरूख खान, राशिद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

बंगळुरूचा संघ -फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक, स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल. 

टॅग्स :मोहम्मद सिराजआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सशाहरुख खान