Join us  

IPL 2024: अतिशय वाईट!! हार्दिक पांड्याचा 'असा' अपमान? 'तो' धावत सुटला अन् लोक ओरडू लागले... (Video)

मुंबईची फिल्डिंग सुरु असताना अचानक फॅन्स ओरडू लागले... नेमके काय घडलं? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:21 AM

Open in App

Hardik Pandya Insult, IPL 2024 Mumbai Indians vs Gujarat Titans : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हा सामना मैदानातील खेळासाठी चर्चेत राहिलाच, पण त्याबरोबर हा सामना मैदानात घडलेल्या इतर गोष्टींमुळेच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने मुंबईवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. सामन्याच्या टॉसच्या वेळी हार्दिक पांड्याला लोकांनी चिडवले. स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर सामना गुजरातने जिंकला. पण सामन्याच्या मध्येच एक विचित्र घटना घडली. सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात जी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यानुसार हार्दिक पांड्याचा इतका वाईट प्रकारे अपमान याआधी कधीही झाला नसेल.

नक्की काय घडले?

अहमदाबादच्या स्टेडियमवर गुजरातच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, पण अखेर शुबमन गिलच्या गुजरातने मुंबईवर मात केली. सामन्यात मुंबईची फिल्डिंग सुरू होती. त्यावेळी अचानक मैदानात एक कुत्रा घुसला आणि सैरावैरा पळत सुटला. कुत्रा मध्ये आल्याने काही काळासाठी सामना थांबला. यावेळी स्टेडियममध्ये असलेले प्रेक्षक जोरजोरात हार्दिक-हार्दिक असे ओरडू लागले असा व्हिडीओ पोस्ट करून दावा करण्यात आला आहे. हा दावा खरा असेल तर हार्दिक पांड्याचा घरच्या मैदानावर घरातल्या चाहत्यांनीच वाईट पद्धतीने अपमान केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गुजरातने जिंकलेल्या सामन्यात कर्णधार शुबमनने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. साई सुदर्शनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. राहुल तेवातियानेही २२ धावा केल्या. १६८ धावांचा पाठलाग करताना ब्रेव्हिस (४६) आणि रोहित शर्मा (४३) दोघांची अर्धशतके हुकली. तिलक वर्माने २५ धावा केल्या. पण मुंबईला अखेरच्या षटकात ६ धावांनी पराभूत व्हावेच लागले.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यागुजरात टायटन्सरोहित शर्मा