IPL 2024, GT vs KKR Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्स याचे क्वालिफायर १ खेळणे पक्के झाले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धची आजची अहमदाबाद येथील लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिले गेले. यामुळे KKR चे १९ गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे KKR क्वालिफायर १ साठी पात्र ठरला आहे.

GT ला मागील ५ सामन्यांत ३ पराभवांचा सामना करावा लागला आहे, तेच KKR ने पाचपैकी ४ सामने जिंकले आहेत. GT साठी हा सामना महत्त्वाचा होता, पंरतु पावसाने त्यांच्या मार्गात खोडा घातला. विजांच्या कडकडाटासह अहमदाबाद येथे जोरदार पाऊस सुरू राहिला. पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, परंतु पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. ९.१५ वाजता पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि त्यामुळे हळुहळू षटकंही कमी होऊ लागली होती. १०.१५ वाजता अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले.
सामना रद्द झाल्याने काय?
KKR १९ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये स्थान पक्के केले
मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स यांच्यानंतर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा GT तिसरा संघ ठरला