IPL 2024, GT vs KKR Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्स आज अहमदाबादमध्ये खेळणार आहे. उर्वरित दोन सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरात टायटन्सचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. GT ला मागील ५ सामन्यांत ३ पराभवांचा सामना करावा लागला आहे, तेच KKR ने पाचपैकी ४ सामने जिंकले आहेत. GT साठी हा सामना महत्त्वाचा आहे, पंरतु पावसाने त्यांच्या मार्गात खोडा घातलेला दिसतोय.. विजांच्या कडकडाटासह अहमदाबाद येथे जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अजून नाणेफेकही झालेली नाही. पण, हा सामना रद्द झाल्यास काय?
अहमदाबादहून बातमी येत आहेत की, गेल्या दोन तासांपासून खेळपट्टी झाकली गेली आहे. सायंकाळी पाचपासून ढगाळ वातावरण होऊ लागले. सहा वाजता पाऊस आल्याने उपस्थित चाहत्यांसह सर्वांना धावपळ करावी लागली. पण, आता पाऊस थांबला आहे आणि ढगाळ वातावरण आहे. मात्र, खेळपट्टी देखील झाकलेली आहे आणि त्यावर भरपूर पाणी आहे. त्यामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे.
सामना रद्द झाल्यास काय?
- KKR १९ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये स्थान पक्के करतील
- मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स यांच्यानंतर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा GT तिसरा संघ ठरेल