Join us

VIDEO : "RCBला एक ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सपोर्ट कर", चाहत्याची धोनीकडे मागणी अन्...

IPL 2024 : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:33 IST

Open in App

महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी प्रसिद्धीपासून नाही... कारण सर्वांचा लाडका कॅप्टन कूल धोनी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. धोनीची पत्नी साक्षी माहीचे नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना धोनीची झलक दाखवत असते. आता धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरसीबीचा एक चाहता आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धोनीकडे विनंती करतो. आरसीबीच्या चाहत्याची मागणी ऐकून धोनीनेही त्याच्याच शैलीत खास उत्तर दिले. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून मंगळवारी आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव पार पडला. 

लिलावाच्या एक दिवसानंतर एका कार्यक्रमात मुलाखत देताना धोनीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अशातच आरसीबीच्या एका चाहत्याने धोनीला प्रश्न केला की, आम्ही ट्रॉफी कशी जिंकू शकतो. आमच्या संघाला पाठिंबा दे... चाहत्याच्या प्रश्नावर धोनीने मन जिकणारं उत्तर दिलं. "तू एक यशस्वी कर्णधार आहेस आणि तुझ्या नेतृत्वात सीएसकेने पाचवेळा ट्रॉफी जिंकली आहे. मी १६ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चाहता आहे. त्यामुळे एक किताब जिंकण्यासाठी तू माझ्या आवडत्या संघाला सपोर्ट कर...", चाहत्याच्या या प्रश्नावर धोनी हसत हसत म्हणाला, "तुला माहित आहे का, तो एक चांगला संघ आहे. पण क्रिकेटमध्ये सर्वकाही नियोजनानुसार होत नाही हे आपल्या माहित असायला हवे. त्यामुळे आयपीएलमधील सर्व १० संघ मजबूत आहेत. संघातील खेळाडू तंदुरूस्त असतील दुखापत नसेल तर तो संघ अधिक मजबूत असतो. जेव्हा एखादा खेळाडू सामन्याला मुकतो तेव्हा समस्या निर्माण होते."

धोनीने आणखी सांगितले की, जर एखादा संघ दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कोणत्याही मोठ्या खेळाडूला मुकत असेल तर ती एक समस्या असते. आरसीबी हा एक चांगला संघ आहे आणि प्रत्येकाला विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. मी सर्व संघांना शुभेच्छा देतो, परंतु त्याहूनही अधिक मी सध्या काहीही करू शकत नाही. कारण मी जर आरसीबीप्रमाणे इतर संघाला पाठिंबा दिला तर आमचे चाहते काय विचार करतील.

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स