सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, दिल्ली कॅपिटल्सला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही फलंदाजांची लीग होऊ लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:08 PM2024-04-20T23:08:38+5:302024-04-20T23:12:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : SRH beat Delhi Capitals and jump into second place in points table, T Natarajan takes 4 wickets | सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, दिल्ली कॅपिटल्सला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी 

सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, दिल्ली कॅपिटल्सला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही फलंदाजांची लीग होऊ लागली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आजही ४५० हून अधिक धावा संघांनी कुटल्या. सनरायझर्स हैदराबादचे वादळ रोखणे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनाही नाही जमले. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन वादळाचा वेग किंचित मंद केला, परंतु DC समोर तगडे लक्ष्य उभे राहिले. दिल्लीच्या २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या वादळाने SRH चे टेंशन वाढवले होते. रिषभ पंतनेही चांगले फटके खेचले, परंतु दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे नाही ठरले. टी नटराजनने १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 

२२ वर्षीय खेळाडूने SRH ला वेड लावले, DC कडून वेगवान अर्धशतक ठोकले 

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नसली तरी २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कने ( JAKE FRASER-MCGURK ) वादळी फटकेबाजी करून सनरायझर्स हैदराबादचे टेंशन वाढवले होते. त्याने दिल्लीकडून आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान व एकंदर तिसरी जलद फिफ्टि ठोकली. डेव्हिड वॉर्नरला (१) आज अपयश आले. पृथ्वी शॉ याने ५ चेंडूंत १६ धावा केल्या, परंतु वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट घेतली. जॅक फ्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला आणि ३० चेंडूंत ८४ धावा चोपल्या. जॅक १८ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ अभिषेकही २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४२ धावांत माघारी परतला, मयांक मार्कंडेने चतुराईने त्याला केले. 



कर्णधार पॅट कमिन्सने गोलंदाजीत योग्य बदल केल्याचा SRH ला फायदा झाला. नितिश रेड्डी व टी नटराजन यांनी अनुक्रमे त्रिस्तान स्तब्स ( १०) व ललित यादव ( ७) यांना बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद १६६ अशी केली.  त्यांना ३० चेंडूंत १०१ धावा करायच्या होत्या. रिषभ पंत आणि अक्षर पटेल ही जोडी त्यांची शेवटची आशा होती. पटेल ( ६) नटराजनच्या फुलटॉसवर झेलबाद झाला. त्याच षटकात नटराजनने दिल्लीच्या एनरिच नॉर्खियाचा त्रिफळा उडवला अन् कुलदीप यादवला पायचीत केले. नटराजनने ४ षटकांत १९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या आणि ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. नितिश रेड्डीने दिल्लीचा दहा फलंदाज १९९ धावांवर माघारी पाठवला आणि हैदराबादने ६७ धावांनी सामना जिंकला. रिषभ ४४ धावांवर बाद झाला. हा विजय मिळवून हैदराबाद १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

तत्पूर्वी, ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले. अभिषेकने १२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ४६ धावा चोपल्या. हेडने ३२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. धमाकेदार सुरुवातीनंतर SRH ने २३ धावांत ४ विकेट्स गमवाल्या आणि त्यातल्या तीन विकेट्स कुलदीपने घेतल्या. नितिश कुमार रेड्डी ( ३७) व शाहबाज अहमद यांनी ४७ चेंडूंत ६७ धावा जोडल्या. शाहबाजने  २९ चेंडूंत नाबाद ५९ धावा चोपल्या संघाला ७ बाद २६६ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : SRH beat Delhi Capitals and jump into second place in points table, T Natarajan takes 4 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.