4,1,4,4,6,4,6,6,1,4,6,1,6,6,6! २२ वर्षीय खेळाडूने SRH ला वेड लावले, DC कडून वेगवान अर्धशतक ठोकले 

आयपीएल  इतिहासात तीनवेळा २५० हून अधिक धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:22 PM2024-04-20T22:22:11+5:302024-04-20T22:22:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : JAKE FRASER-MCGURK SMASHED FIFTY FROM JUST 15 BALLS, FASTEST IN DEHLI CAPITALS HISTORY | 4,1,4,4,6,4,6,6,1,4,6,1,6,6,6! २२ वर्षीय खेळाडूने SRH ला वेड लावले, DC कडून वेगवान अर्धशतक ठोकले 

4,1,4,4,6,4,6,6,1,4,6,1,6,6,6! २२ वर्षीय खेळाडूने SRH ला वेड लावले, DC कडून वेगवान अर्धशतक ठोकले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नसली तरी २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कने ( JAKE FRASER-MCGURK ) वादळी फटकेबाजी करून सनरायझर्स हैदराबादचे टेंशन वाढवले. त्याने दिल्लीकडून आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान फिफ्टि ठोकली आणि १० षटकांत संघाला ४ बाद १३८ धावांपर्यंत पोहोचवले. 


ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले.  आयपीएल  इतिहासात तीनवेळा २५० हून अधिक धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. SRH चा संघ आज सहज तीनशेपार जाईल असे वाटले होते, परंतु कुलदीप यादवने अनुभव कामी आणला व  ४ विकेट्स घेऊन त्यांच्या धावांची गती संथ केली. अभिषेकने १२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ४६ धावा चोपल्या. हेडने ३२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. धमाकेदार सुरुवातीनंतर SRH ने २३ धावांत ४ विकेट्स गमवाल्या आणि त्यातल्या तीन विकेट्स कुलदीपने घेतल्या. नितिश कुमार रेड्डी ( ३७) व शाहबाज अहमद यांनी ४७ चेंडूंत ६७ धावा जोडल्या. शाहबाजने  २९ चेंडूंत नाबाद ५९ धावा चोपल्या संघाला ७ बाद २६६ धावांपर्यंत पोहोचवले. 

डेव्हिड वॉर्नरला ( १) त्याच्या माजी संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही, पृथ्वी शॉ याने ५ चेंडूंत १६ धावा केल्या, परंतु वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट घेतली. जॅक फ्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. जॅकने ( 4,4,6,4,6,6 ) सुंदरच्या एका षटकात ३० धावा कुटल्या आणि दिल्लीने पॉवर प्लेमध्ये २ बाद ८८ धावा उभारल्या. जॅकने १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले, जे दिल्ली कॅपिटल्सकडून वेगवान ठरले. त्याने ख्रिस मॉरिसचा ( १७) विक्रम मोडला. तो १८ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावांवर माघारी परतला.  

Fastest fifties in IPL 

13b - Jaiswal v KKR (2023)
14b - KL Rahul v DC (2018) 
14b - Cummins v MI (2022)
15b - Yusuf v SRH (2014) 
15b - Narine v RCB (2017) 
15b - Pooran v RCB (2023)
15b - McGurk v SRH (2024)*

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Marathi : JAKE FRASER-MCGURK SMASHED FIFTY FROM JUST 15 BALLS, FASTEST IN DEHLI CAPITALS HISTORY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.