मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर Ishan Kishan वर कारवाई! वाचा नेमकं काय चुकलं त्याच

मुंबई इंडियन्सला सहावा पराभव पत्करावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:36 PM2024-04-27T23:36:38+5:302024-04-27T23:39:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : Ishan kishan has been fined 10% of his Match fees for breaching the IPL Code of Conduct against Delhi Capitals. | मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर Ishan Kishan वर कारवाई! वाचा नेमकं काय चुकलं त्याच

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर Ishan Kishan वर कारवाई! वाचा नेमकं काय चुकलं त्याच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : मुंबई इंडियन्सला सहावा पराभव पत्करावा लागला आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. उर्वरित ५ सामन्यांत विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफमध्ये कदाचित प्रवेश मिळू शकतो. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना १० धावांनी पराभव पत्करावा लागला. DC च्या २५७ धावांचा पाठलाग करताना MI ला ९ बाद २४७ धावा करता आल्या. या पराभवानंतर MI चा सलामीवीर इशान किशन ( Ishan Kishan ) याच्यावर कारवाई केली गेली. 


जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. त्याने अभिषेक पोरेलसह ( ३६) ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप ( ४१), रिषभ पंत ( २९) त्रिस्तान स्तब्स ( ४८) यांनी  संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. प्रत्युत्तरात इशान किशन ( २०), रोहित शर्मा ( ८), सूर्यकुमार यादव ( २६) कमी धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या ( ४६) व तिलक वर्मा यांनी ३९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रसिख सलामने ३ धक्के देताना मॅच फिरवली. टीम डेव्हिड  ( ३७) व तिलक ( ६३) यांनी झुंज अपयशी ठरली.

दरम्यान, IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल इशान किशनला फटकारले गेले  आणि त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. इशानला ९ सामन्यांत २१२ धावा करता आल्या आहेत आणि त्याचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे अशक्य वाटत आहे. 
 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : Ishan kishan has been fined 10% of his Match fees for breaching the IPL Code of Conduct against Delhi Capitals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.