IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपडणारे गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. GT व DC यांनी प्रत्येकी ८ सामने खेळले असले तरी अनुक्रमे ८ व ६ गुण त्यांच्या खात्यात आहेत. उभय संघ आतापर्यंत ४ वेळा समोरासमोर आले आहेत आणि दोघांन प्रत्येकी २ विजय नावावर केले आहेत. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Milestones Alert:
राशिद खानला आयपीएलमध्ये १५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ बळी हवे आहेत
विजय शंकरने पाच षटकार खेचताच तो आयपीएलमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण करेल
डेव्हिड मिलरला आयपीएलमध्ये २०० चौकार पूर्ण करण्यासाठी ५ वेळा चेंडू सीमापार पाठवावा लागेल
रिषभ पंतला आयपीएलमध्ये १५० षटकार पूर्ण करण्यासाठी ८ सिक्स खेचावे लागतील
अक्षर पटेलला आयपीएलमध्ये १५०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी २५ धावा हव्या आहेत
दिल्लीने आज पृथ्वी शॉ याच्यासोबत जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला सलामीला पाठवले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅकगर्कला बाद करण्याची संधी मिळाली होती, परंतु राशिद खानला कॅचसाठी योग्य प्रयत्न करता आला नाही. मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. वॉरियरने त्याच षटकात पृथ्वीला ( ११) बाद केले आणि नूर अहमदने अप्रतिम झेल घेतला. पण, यावरून वाद सुरू झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करून हा out or not out असे ट्विट करून नाराजी व्यक्त केल. मेंटॉर सौरव गांगुलीही नाराज दिसला.
दरम्यान, शुबमन गिलने मोठा विक्रम नावावर केला. कमी वयात १०० आयपीएल सामने खेळणारा तो दुसरा युवा खेळाडू ठरला. राशिद खानने २४ वर्ष व २२१ दिवसांत हा पराक्रम केला होता आणि आज शुबमन २४ वर्ष व २२९ दिवसांचा आहे. त्याने विराट कोहली ( 25y, 182d ), संजू सॅमसन ( 25y, 335d ) आणि पियुष चावला ( 26y, 108d) यांना मागे टाकले.