IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएल २०२४ मधील सामना चुरशीचा झाला. DC च्या २२४ धावांच्या प्रत्युत्तरात GT कडून चांगला संघर्ष पाहायला मिळाला. रसिख सलाम व कुलदीप यादव यांनी दोन विकेट्स घेऊन दिल्लीला आशेचा किरण दाखवला होता. पण, डेव्हिड मिलरने 'Killer' फटकेबाजी करून दिल्लीच्या पोटात गोळा आणला. रसिखने अफलातून झेल घेत मिलरचा अडथळा दूर केला अन् दिल्लीच्या जीवात जीव आला. पण, राशिद खानने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली. मात्र, त्रित्सान स्तब्सने दिल्लीसाठी वाचवलेल्या पाच धावा निर्णायक ठरला आणि त्यांनी गुजरातला ४ धावांनी हार मानावी लागली. दिल्लीच्या विजयात रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पृथ्वी शॉ ( ११), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( २३) व शे होप ( ५ ) यांना संदीप वॉरियरने माघारी पाठवले. पण, रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. अक्षरने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. त्रिस्तान स्तब्सने७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. रिषभने २०व्या षटकात २,१w,६,४,६,६,६ अशी तुफान फटकेबाजी केली. दिल्लीने शेवटच्या १० चेंडूंत ५० धावा जोडल्या आणि ४ बाद २२४ धावा उभ्या केल्या. रिषभने ४३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्मा ( ७७ धावा) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
साई किशोरने सलग दोन षटकार खेचून व्याजासह वसूली केली. रसिखने शेवटच्या चेंडूवर साईचा ( १३) त्रिफळा उडवला. ६ चेंडू १९ धावा असा सामना अजूनही थरारक होता आणि राशिद स्ट्राईकवर होता. मुकेशच्या पहिल्या २ चेंडूवर राशिदने चौकार खेचले. तिसरा व चौथा चेंडू डॉट गेला, कारण राशिदने धाव घेण्यास नकार दिला. पाचव्या चेंडूवर ६ मारून राशिदने १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, गुजरातला ८ बाद २२० धावाच करता आल्या आणि दिल्लीने ४ धावांनी सामना जिंकला. राशिद ११ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला.