Join us

रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

IPL 2024 : ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिषभला भीषण अपघात झाला आणि तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:06 IST

Open in App

IPL 2024  ( Marathi News ) -  यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant ) याच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ता अपघातानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. पण, त्याने कसून मेहनत घेतली आणि आता तो पुनरागमनासाठी तयार आहे. पण, त्याआधी  पंत रविवारी त्याच्या घराजवळ मुलांसोबत गोट्या खेळताना दिसला. पंतने स्वत: त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंड कपड्याने झाकले आहे. बालपणीच्या दिवसांची आठवण करून देताना रिषभ शेजारच्या मुलांसोबत मजा करताना दिसला.

रिषभला NCA  ५ मार्च रोजी  तंदुरुस्त असल्याचे घोषित करेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली म्हणाला होता. ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिषभला भीषण अपघात झाला आणि तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १७ व्या आवृत्तीसह रिषभ पुनरागमन करणार आहे. दरम्यान, गांगुलीने संकेत दिले की रिषभला आयपीएलमध्ये थेट यष्टीरक्षक म्हणून सामील केले जाऊ शकत नाही.

फलंदाज रिषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अशा परिस्थितीत रिषभ पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंत गेल्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला नव्हता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या जागी संघाचे नेतृत्व केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीसाठी शेवटचा हंगाम काही खास नव्हता. आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध २३ मार्च रोजी मोहाली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

टॅग्स :रिषभ पंतआयपीएल २०२३ऑफ द फिल्ड