Join us  

IPL 2024 DC vs MI: लाईव्ह सामन्यात पतंगाची हजेरी; रोहित शर्मा-रिषभ पंत एकवटले अन्...

IPL 2024 DC vs MI Live Match Updates: आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 6:01 PM

Open in App

IPL 2024 DC vs MI Live Match Updates In Marathi । नवी दिल्ली: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यातून यजमान दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली. (IPL Viral Video) मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून जेक फ्रेजर-मॅकगर्कने स्फोटक खेळी करत पाहुण्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. त्याने २७ चेंडूत ६ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८७ धावा कुटल्या. (IPL 2024 News) 

यजमान दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद २५७ धावा करून इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासातील दिल्लीची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. २५८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी सावध खेळी केली. रोहित शर्मा फलंदाजी करत असताना लाईव्ह सामन्यात एक नाट्यमय घडामोड घडली. 

मुंबईचा सलामीवीर रोहित फलंदाजी करत असताना अचानक एका पतंगाची मैदानात एन्ट्री झाली. पतंग पाहताच रिषभ पंतने रोहितच्या दिशेने धाव घेतली. रोहितने पतंग रिषभ पंतकडे सोपवल्यानंतर त्याने लाईव्ह सामन्यात पतंग उडवण्याचा प्रयत्न केला. मग पंचांनी पतंग ताब्यात घेऊन मैदानाच्या बाहेर पाठवण्याचे काम केले. 

मुंबईचा संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. 

दिल्लीचा संघ - रिषभ पंत (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिजाद विलियम्स, मुकेश कुमार, खलील अहमद. 

टॅग्स :आयपीएल २०२४रिषभ पंतरोहित शर्मामुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स