Join us

IPL 2024: कोलकाताच्या आव्हानास दिल्ली सज्ज

IPL 2024, DC Vs KKR: चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय केवळ अपघाताने मिळाला नव्हता, हे दाखवून देण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी कोलकाता संघाविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 05:57 IST

Open in App

विशाखापट्टणम : चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय केवळ अपघाताने मिळाला नव्हता, हे दाखवून देण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी कोलकाता संघाविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज असेल. दुसरीकडे कोलकाताचा डोळा विजयी हॅट्ट्रिकवर आहे. 

दिल्ली संघ-वॉर्नर- पृथ्वी शॉ यांच्यावर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. त्यानंतर ऋषभ, ट्रिस्टन स्टब्स, मिचेल मार्श यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.- एन्रिच नॉर्खिया, खलील अहमद यांचा मारा भेदक आहे. मुकेश आणि ईशांत शर्मादेखील उपयुक्त ठरत आहेत. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ लाभणे आवश्यक आहे.

कोलकाता संघ- फिल सॉल्ट, अष्टपैलू आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून कर्णधार श्रेयस अय्यरनेदेखील धावा काढल्या. या संघाने सलग दोन सामने जिंकले.- वेगवान हर्षित राणाने चमक दाखविली तर महागडा मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती हे अपयशी ठरले. या दोघांकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स