Join us  

ऋतु'राज'! CSK साठी शतक झळकावणारा पहिला कर्णधार; गायकवाड-शिवम दुबेने LSG ला चोपले 

अजिंक्य रहाणे ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना LSG च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 9:16 PM

Open in App

 IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने खणखणीत शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला शिबम दुबेची खणखणीत साथ मिळाली आणि दोघांनी लखनौ सुपर जायंट्सची बेक्कार धुलाई केली. 

अजिंक्य रहाणे ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना LSG च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले. पण, त्यांच्या या मेहनतीवर CSK चा कर्णधार ऋतुराजने पाणी फिरवले. रवींद्र जडेजा १९ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराज दमदार फटकेबाजी करताना दिसला. ऋतुराजला रोखणे LSG ला अवघड होऊन बसले होते. CSK साठी सलामीवीर म्हणून २००० हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला. शिवम दुबने १६ व्या षटकात सलग ३ उत्तुंग षटकार खेचून ऋतुसह २४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने पुढच्या षटकाची सुरूवात षटकाराने केली. 

ऋतुराजने ५६ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्यात ११ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. सुरेश रैना, शेन वॉटसन व मुरली विजय यांच्यानंतर चेन्नईसाठी दोन शतकं झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. ऋतुराजचे हे ट्वेंटी-२०तील सहावे शतक ठऱले आणि त्याने  लोकेश राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादव व शुबमन गिल ( ५) यांना त्याने मागे टाकले. दुसऱ्या बाजूने शिवमनेही २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर रन आऊट झाला. शेवटचे दोन चेंडू  शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला आणि चेपॉकवर एकच जयघोष सुरू झाला. ऋतुराज ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. धोनीने १ चेंडूंत चार धावा करून चेन्नईला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडलखनौ सुपर जायंट्स