Join us  

IPL 2024 मधील सर्वात भारी क्षण! MS Dhoni अन् गौतम गंभीर समोरासमोर आले अन्... 

IPL 2024 मधील अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. जेव्हा २०११च्या वर्ल्ड कप विजयातील दोन नायक MS Dhoni आणि गौतम गंभीर ( Gautam Gambhir) समोरासमोर आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 11:22 PM

Open in App

IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉकवर CSK ने सांघिक कामगिरी करताना तिसरा विजय नावावर केला आणि दोन सामन्यांतील पराभवाची मालिका मोडली. KKR च्या ९ बाद १३७ धावांचा CSK ने १७.४ षटकांत ३ बाद १४१ धावा करून विजय मिळवला. या विजयानंतर IPL 2024 मधील अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. जेव्हा २०११च्या वर्ल्ड कप विजयातील दोन नायक MS Dhoni आणि गौतम गंभीर ( Gautam Gambhir) समोरासमोर आले. 

रवींद्र जडेजा व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना KKR ची हवा काढली. त्यांच्याकडून अंगकृष रघुवंशी ( २४), सुनील नरीन ( २७) व कर्णधार श्रेयस अय्यर ( ३४) यांनी चांगला खेळ केला. प्रत्युत्तरात, रचीन रविंद्र ( १५)  व ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज व डॅरील मिचेल ( २५) मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी ५५ चेंडूंत ७० धावा जोडल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने ताबडतोड फटकेबाजी केली. 

ऋतुराज ५८ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. शिवमने १८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. विजयासाठी ३ धावा हव्या असताना महेंद्रसिंग धोनी आला अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. चेन्नईने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यानंतर धोनी व कोलकाताचा मेंटॉर गौतम गंभीर यांनी एकमेकांना मिठी मारली. गौतम गंभीर सातत्याने धोनीवर टीका करतो, असा लोकांचा समज आहे. पण, आजच्या चित्राने हा गैरसमज दूर नक्की झाला असेल.   

टॅग्स :आयपीएल २०२४महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीरचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स