Join us

ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये 'Lord' परतला; KKR ला मिळणार टक्कर

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:07 IST

Open in App

IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगतोय.  ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा CSK घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे.  त्यांना मागील दोन अवे सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादकडून हार पत्करावी लागली आहे. तेच श्रेयस अय्यरच्या KKR ने सलग तीन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. 

KKR ने पॉवर प्लेमध्ये यंदाच्या पर्वात सर्वाधिक १२च्या सरासरीने फटकेबाजी केली आहे. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद ( ११.६६) संघाचा क्रमांक येतो. सुनील नरीन व फिल सॉल्ट यांनी १७२च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. पण, चेन्नईला घरच्या मैदानाचा फायदा उचलता येणार आहे आणि त्यांनी येथे KKRविरुद्ध १३ पैकी ९ सामने जिंकले आहेत. डेथ ओव्हरमध्ये रिंकू सिंग, शिमरोन हेटमायर, महेंद्रसिंग धोनी व आंद्रे रसेल यांची आतषबाजी पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.  हेड टू हेड रेकॉर्डमध्ये CSK ने १८, तर KKR ने १० लढती जिंकल्या आहेत व १ लढत ड्रॉ राहिली आहे.

चेन्नईच्या संघात आज २ बदल पाहायला मिळत आहेत. पथिराणा आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. दीपक चहरच्या जागी शार्दूल ठाकूरचे पुनरागमन झालेय, तर मुस्ताफिजूर व समीर रिझवी हेही आज खेळणार आहेत.

 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सशार्दुल ठाकूरकोलकाता नाईट रायडर्स