Virat Kohli poetry : ४९, पिकल, डक...! विराट कोहलीने जुळवले यमक अन् केली कविता; पण, स्मृती मानधनाच्या विधानावर खुदकन हसला

IPL 2023, RCB : विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज खेळी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:15 PM2023-04-04T17:15:08+5:302023-04-04T17:15:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023,  Virat Kohli poetry RCB : Virat Kohli dishes out inspiring poetry for Royal Challengers Bangalore, laugh on Smriti Mandhana that comment, Video  | Virat Kohli poetry : ४९, पिकल, डक...! विराट कोहलीने जुळवले यमक अन् केली कविता; पण, स्मृती मानधनाच्या विधानावर खुदकन हसला

Virat Kohli poetry : ४९, पिकल, डक...! विराट कोहलीने जुळवले यमक अन् केली कविता; पण, स्मृती मानधनाच्या विधानावर खुदकन हसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, RCB : विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज खेळी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा चोपल्या. RCB ने पहिल्याच सामन्यात ८ विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद केली आणि त्यांचा पुढील सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध कोलकाता येथे होणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांची धुलाई करणारा विराट कवी बनल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने यमक जुळवून केलेली कविता प्रचंड व्हायरल झाली आहे. 

IPL 2023, RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 'मॅच विनर'ची आयपीएलमधून माघार; विराट कोहली टेंशनमध्ये

RCB insider म्हणून एक व्हिडीओ फ्रँचायझीने अपलोड केला आणि त्यात Mr Nags सोबत विराट दिलखुलास गप्पा मारताना दिसला. यावेळी नॅग्सने त्याला कविता करायला सांगितली आणि त्यासाठी त्याने विराटला ४९, पिकल, डक असे शब्द दिले. विराटनेही एका कागदावर पटापट यमक जुळवण्यास सुरूवात केली आणि अप्रतिम कविता लिहिली. ''Fullfill you desires, ignite the fire, Bat through the tough times, sometimes it's 263 & sometimes 49, Life can put you in a pickle, Laugh through like it's a tickle, whether you get a hundred or a duck, life goes on, don't get stuck," अशी विराटने कविता केली. 


यंदा महिला प्रीमिअर लीगमध्ये RCBच्या संघाचे नेतृत्व स्मृती मानधानाने केले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्मृतीला फ्रँचायझी व विराट बद्दल एक प्रश्न विचारला गेला होता आणि त्यावर तिने विराटने RCBकडून जे यश मिळवले आहे, तसेच मी मिळवण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले होते. याबाबत विराटला विचारले असता तो खुदकन हसला.   

 
दरम्यान, RCBचा मॅच विनर फलंदाज रजत पाटीदार ( Rajat Patidar) याने आयपीएलमधून टाचेच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. RCB ने आज रजतच्या माघारीची अधिकृत घोषणा केली.  RCB ने  ट्विट केले की,'' दुर्दैवाने रजत पाटीदार आयपीएल २०२३ मधून टाचेला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करणार आहोत. प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी रजतच्या जागी कोणाला घ्यायचे याचा निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही.''  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023,  Virat Kohli poetry RCB : Virat Kohli dishes out inspiring poetry for Royal Challengers Bangalore, laugh on Smriti Mandhana that comment, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.