Virat Anushka IPL 2023: मैदानात विराटच्या बाबतीत 'तो' प्रकार घडताच अनुष्काचा चेहराच पडला, वाचा काय घडलं

विराट कोहलीने बंगलोरसाठी झुंज देत ठोकलं अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 01:27 PM2023-04-27T13:27:31+5:302023-04-27T13:34:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Virat Kohli got out Anushka Sharma face expressions video viral RCB vs KKR | Virat Anushka IPL 2023: मैदानात विराटच्या बाबतीत 'तो' प्रकार घडताच अनुष्काचा चेहराच पडला, वाचा काय घडलं

Virat Anushka IPL 2023: मैदानात विराटच्या बाबतीत 'तो' प्रकार घडताच अनुष्काचा चेहराच पडला, वाचा काय घडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Anushka Sharma reaction, IPL 2023: विराट कोहलीची बॅटिंग सुरू असताना आनंदाने उड्या मारणाऱ्या अनुष्का शर्माचे एक वेगळेच रूप बुधवारी पाहायला मिळाले. IPL 2023 चा 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात RCBला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे दु:ख अनुष्काच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 201 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या बंगळुरूचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावाच करू शकला. कोहली आणि महिपाल लोमरॉर वगळता बंगळुरूच्या इतर कोणत्याही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. कर्णधार कोहलीने 37 चेंडूत 54 तर लोमरॉरने 18 चेंडूत 34 धावा ठोकल्या.

कोहलीला रसेलने धाडलं माघारी, वेंकटेश अय्यरने टिपला झेल

जोपर्यंत दोघे क्रिझवर उभे होते तोपर्यंत बंगळुरूचा विजय दिसत होता, पण 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर प्रथम लोमरॉर वरुण चक्रवर्थीचे लक्ष्य बनला, त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेलने कोहलीला बाद केले. व्यंकटेश अय्यरने कोहलीला झेलबाद केले. तो झेल घेताच स्टँडवर बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्माने विचित्र असं एक्स्प्रेशन दिले.

-----

अनुष्काचा चेहरा पडला...

विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतत असताना अनुष्काच्या चेहऱ्यावर रंग उडालेला दिसला आणि त्यानंतर RCB च्या पराभवाने तिचे मन दुखावले. RCBला या लीगमध्ये चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता प्रत्येक सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा झाला आहे. RCBचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची बॅटही केकेआरविरुद्ध चालली नाही.

Web Title: IPL 2023 Virat Kohli got out Anushka Sharma face expressions video viral RCB vs KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.