Join us  

'टीम इंडिया'मधून OUT, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बाळापासून लांब राहिला... वरूण चक्रवर्थीची संघर्षमय 'कमबॅक स्टोरी'

Varun Chakravarthy Success Story: वरूणने सामनावीराचा पुरस्कार बाळाला आणि पत्नीला केला समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 9:42 AM

Open in App

Varun Chakravarthy Success Story, RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आपल्या घरच्या मैदानावर 201 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 2.2 षटकांत 31 धावा केल्या होत्या. त्याच वेळी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फाफ डु प्लेसिस 17 धावांवर (7 चेंडू) बाद झाला. यानंतर विराट कोहलीने 54 धावा (37 चेंडू) करत बंगळुरूचे आव्हान पुढे नेले, पण कोलकाताच्या अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासमोर RCB ला केवळ 179 धावाच करता आल्या. वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा आणि आंद्रे रसेल यांच्या अचूक गोलंदाजीने केकेआरच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिघांनीही 12 षटकात केवळ 86 धावा दिल्या आणि सात विकेट घेतल्या. तीन विकेट घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बाळापासून लांब राहिला...

ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांसारख्या मोठ्या विकेट घेणार्‍या वरुण चक्रवर्तीने सामन्यानंतर सांगितले की, मला  सामनावीराचा हा पुरस्कार माझ्या नवजात बाळाला आणि पत्नीला समर्पित करायचा आहे. जेव्हा समालोचक हर्षा भोगले म्हणाले की- मी आजपर्यंत बाळाला पाहिलेले नाही, तेव्हा वरूणने उत्तर दिले - आयपीएल संपल्यानंतर नक्कीच तुमची भेट घडवून देईन. डिसेंबर 2022 रोजी त्याने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम रीलवरून चाहत्यांना तो बाबा झाल्याची माहिती दिली होती. पण टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर त्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि वेळप्रसंगी महिनाभरासाठी घरापासून, बाळापासून आणि कुटुंबापासून दूरदेखील राहिला. त्यामुळे अखेर यंदाच्या IPL मध्ये त्याच्या फिरकीची धार पुन्हा दिसून लागली.

मैत्रिणीशी केलं लग्न

तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या वरुण चक्रवर्तीने 2020 मध्ये त्याची गर्लफ्रेंड नेहा खेडेकर सोबत लग्न केले. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. वयाच्या १७ व्या वर्षी क्रिकेट सोडून वरुण चक्रवर्तीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. कारण त्याला अभ्यासात रस होता. बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने पाच वर्षे आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आणि नंतर नोकरी केली, पण काम करावेसे वाटले नाही, म्हणून तो पुन्हा क्रिकेटकडे वळला. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याच्या रहस्यमय फिरकीने आश्चर्यचकित केल्यानंतर, त्याला IPL 2019 च्या मध्ये 8.40 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आणि त्यानंतर त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सभारतीय क्रिकेट संघरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App