Join us

१३७ चेंडूंत ३२६ धावा! मुंबईचा 'सूर्या' लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ आता अंतिम टप्प्यात आली असताना लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात मुंबईचा लोकल बॉय सूर्या दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:48 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ आता अंतिम टप्प्यात आली असताना लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात मुंबईचा लोकल बॉय सूर्या दाखल झाला आहे. मुंबईच्या गाईल्स शिल्ड स्पर्धेत वेगवान त्रिशतक झळकावणारा सूर्यांश शेडगे ( Suryansh Shedge) आयपीएलमध्ये LSGच्या ताफ्यात दाखल झाला आहे. जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट याची रिप्लेसमेंट म्हणून सूर्यांशची निवड केली गेली आहे. १३ वर्षांचा असताना सूर्यांशने गाईल्स शिल्ड स्पर्धेत गुंडेचा अकादमी ( कांदिवली) कडून खेळताना एसपीएसएस मुंबादेवी निकेतन ( बोरीवली) संघाविरुद्ध १३७ चेंडूंत ३२६ धावांची खेळी केली होती. 

२० वर्षीय सूर्यांशने मागच्या वर्षी २५ वर्षांखालील स्पर्धेत ८ सामन्यांत दोन अर्धशतकं आणि १२ विकेट्स घेतल्या होत्या. जयदेवला खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी २० लाखांत सूर्यांशची संघात निवड झाली. आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी १५ गुण आहेत. CSK विरुद्ध DC आणि LSG विरुद्ध KKR या लढतीवर इतरांचे गणित अवलंबून असणार आहे.

मार्च २०१६ व एप्रिल २०१७ या कालावधीत सूर्यांशने दोन दिवसांची कसोटी, ट्वेंटी-२०, वन डे आणि ३० षटकांच्या अशा एकूण ५८ सामन्यांत ७५.६७च्या सरासरीने ३५०२ धावा केल्या होत्या. त्यात २१ अर्धशतकं व ११ शतकांचा समावेश आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्समुंबई
Open in App