IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 05:21 PM2023-04-02T17:21:48+5:302023-04-02T17:22:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs RR Live : Rajasthan Royals post the total of 203/5 in 20 overs. Jos Buttler, Yashasvi, Sanju Samson scored fifties. This is first 200+ scores in this IPL 2023. | IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी ५.५ षटकांत ८५ धावा चोपल्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. पॉवर प्लेमधील ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. बटलर माघारी परतल्यानंतर यशस्वी व कर्णधार संजू सॅमसन यांनीही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना RRला मोठा पल्ला गाठून दिला. 

वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. जोस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी SRHच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून ५.५ षटकांत ८५ धावांची भागीदारी केली.  फजहल फारूकीने ही जोडी तोडली. फारूकीने भन्नाट चेंडू टाकून बटलरच्या बेल्स उडवल्या. बटलर २२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. यशस्वीने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, तीन चेंडूनंतर आक्रमक पूल मारण्याच्या प्रयत्नात त्याने फारुकीला विकेट दिली. यशस्वी ३७ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला आणि संजूसोबतची त्याची ५४ धावांची भागीदारी संपली.  


उम्रानने १५व्या षटकात देवदत्त पडिक्कलचा ( २) दांडा उडवला. संजूनेही २७ चेंडूंत अर्धशतक झळकावताना कॅप्टन इनिंग्ज केली. आता अखेरच्या २-३ षटकांत आणखी आतषबाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा असताना संजू बाद झाला. नटराजनच्या गोलंदाजीवर संजूने खणखणीत फटका मारला अन् अभिषेक शर्माने सीमारेषेच्या अगदी जवळ झेल टिपला. संजू ३२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. राजस्थानने ५ बाद २०३ धावा उभ्या केल्या. फारूकी व नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 
 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, SRH vs RR Live : Rajasthan Royals post the total of 203/5 in 20 overs. Jos Buttler, Yashasvi, Sanju Samson scored fifties. This is first 200+ scores in this IPL 2023.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.