Join us

IPL 2023, SRH vs RR Live : मार, झोड फटकेबाजी! जॉस बटलरने कुटल्या १० चेंडूंत ४६ धावा, RR ने पॉवर प्लेमध्ये रचला इतिहास 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 16:38 IST

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना श्रद्धांजली वाहिली. सर्व खेळाडूंनी दंडावर काळी फित बांधली आहे. जोस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी SRHच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून विक्रमी भागीदारी केली. 

कर्णधार भुवनेश्वर कुमार याचा हा निर्णय RRच्या पथ्यावर पडलेला दिसतोय. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यांनी SRHच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यशस्वी वेगाने धावा कुटताना दिसला. वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्याच षटकात बटलरने सलग दोन खणखणीत षटकार खेचले आणि त्यात यशस्वीनेही हात धुवून घेतले. त्या षटकात १९ धावा चोपल्या.

बटलर-यशस्वीला रोखण्यासाठी भुवी सातत्याने गोलंदाजीत बदल करताना दिसले आणि तेही प्रयोग अपयशी ठरताना दिसले. टी नटराजनच्या पहिल्या षटकात ४,०,४,४,४,१ अशा १७ धावा आल्या. फजहल फारूकीच्या पुढील षटकात बटलरने ३ चौकार खेचून २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पाचव्या षटकात फारूकीने भन्नाट चेंडू टाकून बटलरच्या बेल्स उडवल्या. बटलर २२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला अन् यशस्वीसह त्याची ८५ धावांची ( ५.५ षटकं) भागीदारी संपुष्टात आली. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने १ बाद ८५ धावा केल्या आणि ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. पॉवर प्लेमध्ये बटलरने तिसऱ्यांदा ५०+ धावा करताना ख्रिस गेलशी बरोबरी केली. या विक्रमात डेव्हिड वॉर्नर ( ६) अव्वल स्थानी आहे.  

 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादजोस बटलर
Open in App