IPL 2023, SRH vs DC Live : सनरायझर्स हैदराबादचा 'सुंदर' खेळ; दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये दिसला नाही ताळमेळ

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:17 PM2023-04-24T21:17:02+5:302023-04-24T21:17:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs DC Live Marathi : Washington Sundar (4-0-28-3),  Delhi Capitals 144/9 | IPL 2023, SRH vs DC Live : सनरायझर्स हैदराबादचा 'सुंदर' खेळ; दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये दिसला नाही ताळमेळ

IPL 2023, SRH vs DC Live : सनरायझर्स हैदराबादचा 'सुंदर' खेळ; दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये दिसला नाही ताळमेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली... सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याने एका षटकात DCच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. DCचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी परतला होता आणि अशावेळी मनीष पांडे व उप कर्णधार अक्षर पटेल यांनी SRHला चांगले प्रत्युत्तर दिले. या दोघांच्या भागीदारीमुळे दिल्लीने समाधानकारक पल्ला गाठला. भुवनेश्वर कुमारची आज गोलंदाजी अप्रतिम राहिली. 

W,1,W,4,W! वॉशिंग्टन सुंदरने ५ चेंडूंत दिले ३ धक्के, काव्या मारन आनंदाने नाचू लागली, Video 


फिल सॉल्ट पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिचेल मार्शने दुसऱ्या षटकात मार्को यान्सेनला चार चौकारांसह १९ धावा चोपल्या. भुवी चांगला मारा करत होता, त्याने दोन षटकांत २ धावा देत १ विकेट घेतलेली. टी नटराजनने पाचव्या षटकात मार्शला ( २५) पायचीत केले. SRH ने घेतलेला DRS यशस्वी ठरला. वॉर्नरने आयपीएल २०२३ मधील पहिला षटकार आज खेचला अन् त्याने Six चे १०० साजरे केले. वॉशिंग्टन सुंदरने मात्र वॉर्नरची ( २१) खेळी संपुष्टात आणली. दिल्लीला ५७ धावांवर तिसरा धक्का बसला. त्याच षटकात दिल्लीला आणखी दोन धक्के बसले... सर्फराज खान ( १०) व अमन खान ( ४) यांनाही त्याच षटकात वॉशिंग्टनने माघारी पाठवले.


अनुभवी मनीष पांडेनेही माजी संघ SRHविरुद्ध चांगला खेळ करताना अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. मयांक मार्कंडेने टाकलेल्या १७व्या षटकात अक्षरने सलग तीन चौकार खेचून धावांचा वेग वाढवला. पण, भुवी गोलंदाजीवर आला अन् त्याने अक्षरचा ( ३४) त्रिफळा उडवून ६९ धावांची भागीदारी तोडली. मनीष ( ३४) रन आऊट झाला, वॉशिंग्टनने अप्रतिम थ्रो करून ही विकेट मिळवून दिली. दिल्लीला ९ बाद १४४ धावा करता आल्या. भुवीने ११ धावांत २ विकेट्स घेतल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

 

 

Web Title: IPL 2023, SRH vs DC Live Marathi : Washington Sundar (4-0-28-3),  Delhi Capitals 144/9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.