Join us  

IPL 2023: आयपीएलच्या ट्रॉफीवर लिहिलेला आहे संस्कृत श्लोक, तुम्ही पाहिलाय का? काय आहे त्याचा अर्थ, जाणून घ्या 

IPL 2023: आयपीएलमध्ये विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीवर एक संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला असतो. तुम्ही ही ट्रॉफी बारकाईने पाहिल्यास तुम्हाला तो सहज दिसतो. या मंत्राचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 7:29 PM

Open in App

 जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलची सुरुवात होण्यास आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार असून, पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. सर्व सहभागी संघांची नजर ही आयपीएलच्या ट्रॉफीवर असणार आहे. मात्र आयपीएलमध्ये विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीवर एक संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला असतो. तुम्ही ही ट्रॉफी बारकाईने पाहिल्यास तुम्हाला तो सहज दिसतो. या मंत्राचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का.

आयपीएलच्या पहिल्या हंगामावेळी आयपीएलची ट्रॉपी ही भारताच्या नकाशाच्या रूपात होती. काही वर्षांनंतर ही ट्रॉफी खूप बदलली गेली. त्यानंतर वेळोवेळी टायलट आणि स्पॉन्सर्स बदलत गेले. सध्या टाटा या ट्रॉफीचा टायटल स्पॉन्सर आहे. आयपीएलची नव्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. हा श्लोक तरुणांना प्रेरित करणारा आहे. या ट्रॉफीवर ‘यत्र प्रतिभा प्राप्नोति’ हा श्लोक लिहिलेला आहे. या श्लोकाचा अर्थ जिथे प्रतिभा आणि संधी यांचं मिलन होतं, असा आहे. 

आतापर्यंत आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या मोजक्याच संघाना ही ट्रॉफी जिंकला आली आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलची सर्वाधिक विजेतेपदे पटकावली आहेत. मुंबईने ही ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने ही ट्रॉफी चार वेळा जिंकली आहे. यंदाची आयपीएल ही धोनीची शेवटची आयपीएल ठरू शकते, असं बोललं जात आहे, त्यामुळे चेन्नईच्या खात्यात आणखी एक विजेतेपद आणून आपल्या कारकिर्दीचा विजयी शेवट करण्याचा त्याचा इरादा असेल.  

टॅग्स :आयपीएल २०२३टी-20 क्रिकेट
Open in App