IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झाली नाही. आर अश्विन १० वर्षानंतर आयपीएलमध्ये ओपनिंगला आला, परंतु भोपळ्यावर माघारी परतला. जॉस बटलर ( Jos Buttler) विचित्र पद्धतीने झेलबाद झाला अन् RRच्या डावाला मोठा धक्का बसला.
पंजाब किंग्सने बारसापारा स्टेडियमवर प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानेही वादळी फटकेबाजी केली. प्रभसिमरनने अनपेक्षित खेळी करताना ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. धवनला विदर्भाच्या जितेश शर्माची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ३३ चेंडूंत ६० धावा जोडल्या. जितेश १६ चेंडूंत २७ धावांवर बाद झाला. सिकंदर रझाला ( १) अश्विनने चकवले अन् त्याचा त्रिफळा उडवला. धवनने ५६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या. होल्डरने दुसरी विकेट घेताना शाहरुख खानला ( ११) बाद केले. पंजाबने ४ बाद १९७ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"