IPL 2023, RR vs PBKS Live : बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video 

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:36 PM2023-04-05T22:36:05+5:302023-04-05T22:38:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RR vs PBKS Live : Brilliant caught and bowled by Nathan Ellis to get rid of Jos Buttler, Watch Video | IPL 2023, RR vs PBKS Live : बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video 

IPL 2023, RR vs PBKS Live : बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झाली नाही. आर अश्विन १० वर्षानंतर आयपीएलमध्ये ओपनिंगला आला, परंतु भोपळ्यावर माघारी परतला. जॉस बटलर ( Jos Buttler) विचित्र पद्धतीने झेलबाद झाला अन् RRच्या डावाला मोठा धक्का बसला. 

पंजाब किंग्सने बारसापारा स्टेडियमवर प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.  प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानेही वादळी फटकेबाजी केली. प्रभसिमरनने अनपेक्षित खेळी करताना ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या.  भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. धवनला विदर्भाच्या जितेश शर्माची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ३३ चेंडूंत ६० धावा जोडल्या. जितेश १६ चेंडूंत २७ धावांवर बाद झाला. सिकंदर रझाला ( १) अश्विनने चकवले अन् त्याचा त्रिफळा उडवला. धवनने ५६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या. होल्डरने दुसरी विकेट घेताना शाहरुख खानला ( ११) बाद केले. पंजाबने ४ बाद १९७ धावा केल्या.


जॉस बटलर सलामीला येणे अपेक्षित होते, परंतु त्याला दुखपत झाली आणि RR ने ओपनिंगला यशस्वी जैस्वालसह आर अश्विनला पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएल २०१३ मध्ये अश्विनने KKR विरुद्ध ओपनिंगला आला होता आणि आज दहा वर्षांनी तो पुन्हा सलामीला आला. यशस्वीने पहिलाच चेंडू खणखणीत षटकार खेचला. पण, अर्शदीप सिंगने राजस्थानला धक्के दिले. यशस्वी ( ११) आणि अश्विन ( ०) यांना त्याने माघारी पाठवले. नॅथन एलिसच्या गोलंदाजीर बटलर ( १९) बाद झाला. चेंडू बटलरच्या बॅटला लागून पॅडवर आदळला अन् हवेत उडाला. एलिसने चतुराई दाखवून सुरेख झेल टिपला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

Web Title: IPL 2023, RR vs PBKS Live : Brilliant caught and bowled by Nathan Ellis to get rid of Jos Buttler, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.