IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने शरणागती पत्करली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर RRचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. संजू सॅमसनच्या चूकीच्या कॉलमुळे यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला अन् त्यानंतर GT ने पकड घेतली. RRचे फलंदाज एकामागोमाग माघारी परतले. राशीद खान ( ४-०-१४-३) व नूर अहमद या फिरकीपटूंनी त्यांना नाचवले.
चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video
RR ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस बटलरची ( ८) बॅट त्याच्यावर रुसल्याचे आजही दिसले.. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात त्याची विकेट घेतली. मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वालने त्याचे दडपण येऊ दिले नाही आणि तो चांगली फटकेबाजी करत होता. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ (२१) धावांची भागीदारी केली होती. पण, सहाव्या षटकात दोघांमधील ताळमेळ चुकले अन् अभिनव मनोहरच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे यशस्वीला ( १४) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. ( पाहा विकेट ) जोशूआ लिटलच्या गोलंदाजीवर संजूचा फटका चूकला अन् २० चेंडूंत ३० धावांवर तो माघारी परतला.
१८व्या षटकात मोहित शर्माला गोलंदाजीला आणले, परंतु तोपर्यंत गुजरातच्या अन्य गोलंदाजांनी मोहिम फत्ते केली होती. RRचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आला.