Join us

IPL 2023: प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंग शून्य, वीरेंद्र सेहवागची घणाघाती टीका

IPL 2023: : ‘पराभवासाठी पाँटिंग यांना जबाबदार धरले पाहिजे. मुख्य कोच काहीच करीत नाहीत. ते याबाबतीत ‘झिरो’ आहेत,’ या शब्दांत  माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकावर  कठोर शब्दांत टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 05:54 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘पराभवासाठी पाँटिंग यांना जबाबदार धरले पाहिजे. मुख्य कोच काहीच करीत नाहीत. ते याबाबतीत ‘झिरो’ आहेत,’ या शब्दांत  माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकावर  कठोर शब्दांत टीका केली. या मोसमात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करीत आहे. ओळीने पाच पराभव झाल्यानंतर सेहवाग म्हणाला, ‘जेव्हा दिल्ली संघ चांगली कामगिरी करीत होता, तेव्हा आम्ही त्याचे श्रेय प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना देत होतो. आता दिल्ली खराब कामगिरी करीत असल्याने पराभवाची जबाबदारीही प्रशिक्षकाला घ्यावी लागेल.’ ‘मी यापूर्वीही म्हटले होते की, ‘आयपीएल’मध्ये प्रशिक्षक काहीही करीत नाहीत.  पाँटिंग यांची भूमिका शून्य आहे. ते फक्त व्यवस्थापनासाठी आहेत. कोचचे काम चांगला सराव करून घेणे शिवाय आत्मविश्वास देणे हे असते.’

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२३विरेंद्र सेहवाग
Open in App