IPL 2023, Virat Kohli: एक सामना, दोन शतकं, तीन खेळी, चार वर्षं... IPL 16 मधील 'विराट' पराक्रमाची होत राहील चर्चा

IPL 2023, Virat Kohli: आयपीएलच्या एका सामन्यात दोन शिलेदारांनी शतकं साकारल्याचा पराक्रम सर्वप्रथम २०१६ मध्ये झाला होता. तेव्हाही त्यापैकी एक शिलेदार होता, विराट कोहली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:53 AM2023-05-19T11:53:57+5:302023-05-19T11:59:10+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2023 rcb vs srh: 3rd instance where two players score hundreds in same match virat kohli and heinrich klaasen | IPL 2023, Virat Kohli: एक सामना, दोन शतकं, तीन खेळी, चार वर्षं... IPL 16 मधील 'विराट' पराक्रमाची होत राहील चर्चा

IPL 2023, Virat Kohli: एक सामना, दोन शतकं, तीन खेळी, चार वर्षं... IPL 16 मधील 'विराट' पराक्रमाची होत राहील चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलचा १६ वा हंगाम जसजसा 'प्ले ऑफ'च्या जवळ जातोय, तसा अधिकच रंगतदार होत चाललाय. 'टॉप ४' मध्ये कोण जाणार, याबद्दलची उत्सुकता ताणली जातेय. कारण, गुण आणि सरासरीचं गणित सामन्यागणिक बदलतंय. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील कालचा सामना यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हैदराबादचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी आरसीबीसाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक होतं. हे ओळखूनच ते खेळले आणि 'विराट' विजय नोंदवत त्यांनी आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. 'किंग कोहली'च्या शतकामुळे हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरलाच, पण हेनरिक क्लासेननं तो 'क्लास'ही ठरवला.

आयपीएलच्या एका सामन्यात दोन क्रिकेटवीरांनी शतकं ठोकण्याचा पराक्रम काल तिसऱ्यांदा घडला. २०१९ नंतर चार वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून आला. हैदराबादची अवस्था २ बाद २८ अशी झालेली असताना हेनरिक क्लासेन मैदानावर उतरला आणि ८ चौकार, ६ षटकार खेचत त्यानं अवघ्या ५१ चेंडूत १०४ धावा फटकावल्या. या जोरावरच सनरायझर्सनं १८६ धावांचा डोंगर रचला. पण, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली या जोडीनं धमाल धुलाई करत डोंगरावर विजयाचा झेंडा फडकवला. पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड

सगळेच क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होते, ते 'विराट' शतक कोहलीने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर साकारलं. १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ६३ चेंडूत १०० धावांची खेळी करत कोहलीनं 'टायगर जिंदा है'ची डरकाळी फोडली. आयपीएलमधलं विराटचं हे सहावं शतक ठरलं. 'शतकांचा षटकार' ठोकणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

विराट कोहलीचं शतक अन् सूर्यकुमार यादवची मराठीत पोस्ट; नेहमी करतात एकमेकांचं कौतुक

२०१६, २०१९ आणि २०२३  

आयपीएलच्या एका सामन्यात दोन शिलेदारांनी शतकं साकारल्याचा पराक्रम सर्वप्रथम २०१६ मध्ये झाला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार असलेला विराट कोहली आणि 'मिस्टर ३६०' एबी डिविलियर्स या जोडगोळीने गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात ही वादळी खेळी साकारली होती. 

२०१९ मध्ये बेंगलोर विरुद्ध हैदराबाद सामन्यात डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांची तुफान फटकेबाजी करत शतकं झळकावली होती. त्यानंतर यावर्षीच्या आयपीएलमध्ये हा 'डबल धमाका' पाहायला मिळाला.

विराट कोहली ५०० पार

आयपीएलमध्ये विराट कोहलीला सूर सापडला होता. सहा अर्धशतकी खेळी साकारत त्यानं प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला होता. या भक्कम पायावर कालचं शतक हा कळस ठरलाय. या शतकामुळे विराटनं या हंगामात ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. १३ सामन्यांमध्ये ५३८ धावा करणारा कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. या क्रमवारीत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस ७०२ धावांसह अव्वल स्थानी आहे, तर १३ सामन्यांत ५७६ धावा करणारा शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

  

Web Title: ipl 2023 rcb vs srh: 3rd instance where two players score hundreds in same match virat kohli and heinrich klaasen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.