IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत RCBने राजस्थान रॉयल्सवर ८ धावांनी विजय मिळवताना गुणतालिकेत आगेकूच केली. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli) विक्रमी झेल घेतला अन् RCBकडून असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला. यशस्वी जैस्वालची कॅच घेतल्यानंतर विराट अन् अनुष्का शर्मा ( Virat Kohli & Anushka Sharma) यांच्यातला रोमान्स पाहायला मिळाला.
फॅफ ड्यू प्लेसिस ( ६३) व ग्लेन मॅक्सवेल ( ७७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १२६ धावांची भागीदारी केली. १५ षटकांत RCBच्या ४ बाद १५६ धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर RCBच्या अन्य फलंदाजांना ५ षटकांत ३३ धावाच करता आल्या. RCBने ५ फलंदाज गमावले. बोल्टने ४१ धावांत २, अश्विनने ३६ धावांत १ विकेट घेतली. RCBला जेमतेम ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचता आले.RRची सुरुवातही यजमानांसारखी झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात RRचा ओपनर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. पण, यशस्वी जैस्वाल ( ४७) व लोकल बॉय देवदत्त पडिक्कल ( ५२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावा जोडल्या.
यशस्वीचा झेल घेऊन विराटने आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले आणि RCBकडून हा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने
अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिले. तिही लाजली...
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"