Join us

IPL 2023, RCB vs RR Live : बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video 

राजस्थान रॉयल्सची सुरूवातही तशीच झाली आणि RCBचा मोहम्मद सिराजने भन्नाट चेंडूवर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 18:17 IST

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात विराट कोहलीला माघारी पाठवून चिन्नास्वामी स्टेडियमवर स्मशान शांतता पसरवली. राजस्थान रॉयल्सची सुरूवातही तशीच झाली आणि RCBचा मोहम्मद सिराजने भन्नाट चेंडूवर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. १ धावा १ विकेट पडल्यानंतरही RR ने सामन्यावर सध्यातरी पकड घेतलेली पाहायला मिळतेय. 

W,W! ट्रेंट बोल्टची पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची परंपरा कायम; विराट कोहली Golden Duck, Video

विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर  फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्राण फुंकले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १२६ धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे RCB ने सामन्यात चांगलेच पुनरागमन केले होते, परंतु हे दोघं मागोमाग तंबूत परतले अन् RCBच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली.   फॅफ ३९ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारासह ६२ धावांवर रन आऊट झाला. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल ७७ धावांवर ( ४४ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला. १५ षटकांत RCBच्या ४ बाद १५६ धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर RCBच्या अन्य फलंदाजांना ५ षटकांत ३३ धावाच करता आल्या. RCBने ५ फलंदाज गमावले. बोल्टने ४१ धावांत २, अश्विनने ३६ धावांत १ विकेट घेतली. RCBला जेमतेम ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचता आले.

RRची सुरुवातही यजमानांसारखी झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात RRचा ओपनर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला.  पण, यशस्वी जैस्वाल व लोकल बॉय देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून RCBवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मोहम्मद सिराजरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सजोस बटलर
Open in App