Join us

IPL 2023, RCB vs PBKS: दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors, Video Viral

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 20:02 IST

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजयाची नोंद करताना RCB ने आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना PBKSचा संपूर्ण संघ १५० धावांत तंबूत परतला. मोहम्मद सिराजने २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात विराटने घेतलेले दोन DRS यशस्वी ठरले. DRS चा निर्णय घेण्यासाठी तिसरा अम्पायर रिप्ले पाहत असताना विराट व ग्लेन मॅक्सवेल Stone Paper Scissors खेळताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

विराट कोहलीची 'चूक' RCBला पडली असती महागात, मोहम्मद सिराज होता म्हणून वाचली लाज

फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. फॅफ  ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने दोन विकेट्स घेतल्या. यजमान पंजाब किंग्सची हालत सुरुवातीलाच खराब झाली होती. विराट कोहलीने ( Virat Kohli) दोन अचूक DRS घेतले, मोहम्मद सिराजने धक्के दिले अन् क्षेत्ररक्षणात भन्नाट रन आऊटही केला. पंजाबचा निम्मा संघ ७६ धावांवर तंबूत परतला होता.  

कर्णधार सॅम करन व प्रभसिमरन सिंग यांनी ३३ धावा जोडल्या. प्रभसिमरन ( ४६)  पंजाब किंग्ससाठी आशेचा किरण बनला होता, परंतु वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. हरप्रीत ब्रार व जितेश शर्मा हीच अखेरची आशा PBKSला होती.  मोहम्मद सिराजने १८व्या षटकात हरप्रीत ब्रार ( १२) आणि  नॅथन एलिसचा त्रिफळा उडवला. हर्षल पटेलने अखेरची विकेट घेताना जितेशला ४१ धावांवर ( २७ चेंडू) माघारी पाठवले. पंजाबचा संपूर्ण संघ १५० धावांवर तंबूत परतला अन् बंगळुरूने २४ धावांनी सामना जिंकला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीग्लेन मॅक्सवेल
Open in App