IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दणक्यात सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 11:06 PM2023-04-02T23:06:54+5:302023-04-02T23:07:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs MI Live : Faf Du Plessis scored 73 runs from 43 balls, Virat Kohli unbeaten 82 runs, RCB beat Mumbai Indians by 8 wickets  | IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दणक्यात सुरूवात केली. MI चे सर्व 'तारे' जमिनीवर आपटल्यानंतर तिलक वर्माने ( Tilak Verma) खिंड लढवताना मोठा पल्ला उभारून दिला. पण, विराट कोहली ( Virat Kohli) आणि कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी खणखणीत फटकेबाजी केली. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला; स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला


इशान किशन ( १०), कॅमेरून ग्रीन ( ५), रोहित शर्मा ( १) व सूर्यकुमार यादव ( १५) हे चार फलंदाज ४८ धावांत माघारी परतल्याने मुंबई इंडियन्स अडचणीत सापडले होते. पण, तिलक वर्मा आणि नेहाल वडेरा या युवा खेळाडूंची पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करून गाडी रुळावर आणली. वडेरा २१ धावांवर झेलबाद झाला. टीम डेव्हिड ( ४) अपयशी ठरला, परंतु तिलक खिंड लढवत राहिला. त्याने ४६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकाराने नाबाद ८४ धावा चोपल्या. मुंबईने २० षटकात ७ बाद १७१ धावा केल्या. अर्शद खानने ९ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. कर्ण शर्माने दोन विकेट्स घेतल्या. तिकलच्या या खेळीचा त्याच्या कुटुंबियांनीही मनसोक्त आनंद लुटला. 


विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी आक्रमक सुरूवात केली. चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरने स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा अवघड झेल सोडला. त्यात पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर इशान किशनने फॅफचा झेल टाकला. विराट व फॅफ यांनी पॉवर प्लेमध्ये ५३ धावा जोडून मुंबईचे टेंशन वाढवले. रोहितने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून सूर्यकुमारच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फला मैदानावर उतरवले. फॅफने २९ चेंडूंत आयपीएलमधील २६वे अर्धशतक पूर्ण केले. विराटनेही सुरेख फटकेबाजी करून आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ३००० धावांचा टप्पा ओलांडला आणि फॅफसह आजच्या सामन्यात शतकी भागीदारी पूर्ण केली. विराटने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे हे आयपीएलमधील ४५ वे अर्धशतक ठरले. 


रोहितचे सर्व डावपेच RCBच्या या जोडीने हाणून पाडले आणि मुंबईचा पराभव निश्चित करून टाकला. १४ षटकांत दोघांनी फलकावर १३९ धावा चढवल्या होत्या. विराटचा ६८ धावांवर हृतिकने झेल सोडला. अर्शद खानच्या त्या षटकात मात्र फॅफची विकेट मिळवण्यात मुंबईला यश आले. फॅफ ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार केचून ७३ धावांवर माघारी परतला. कॅमेरून ग्रीनने पुढच्या षटकात दीनेश कार्तिकला ( ०) बाद केले. पण, ग्लेन मॅक्सवेलने सलग दोन षटकार खेचून RCBवर आलेलं दडपण कमी केलं. विराटने ४९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ८२ धावा करताना RCBचा ८ विकेट्स व २२ चेंडू राखून विजय पक्का केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, RCB vs MI Live : Faf Du Plessis scored 73 runs from 43 balls, Virat Kohli unbeaten 82 runs, RCB beat Mumbai Indians by 8 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.