IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा पहिला टप्पा पार झाला आहे आणि चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स यांनी तालिकेत १० गुणांसह आघाडी घेतलीय. कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) प्रवास काही चांगला झालेला दिसत नाही आणि दुसऱ्या हाफमध्ये त्यांचे पुनरागमनाचे प्रयत्न आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ( RCB) आज त्यांचा सामना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB ने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केलीय आणि आज त्यांचा हॅटट्रिकचा प्रयत्न आहे.
या दोन संघांमधील पहिल्या लढतीत शार्दूल ठाकूरने खणखणीत अर्धशतक झळकावून RCBला पराभूत केले होते आणि आता त्याची परतफेड घरच्या मैदानावर करण्यासाठी विराटसेना सज्ज आहे. पण, आजच्या सामन्यात शार्दूल दुखापतीमुळे खेळत नसल्याचे अपडेट्स समालोचक रॉबिन उथप्पा याने दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ७ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवणाऱ्या KKRसाठी पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे जेसन रॉयला आज सलामीला पाठवले गेले आणि त्याने पहिल्या षटकात दोन चौकार मारून अपेक्षित सुरुवात करून दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"