Join us

IPL 2023, RCB vs GT Live : मुंबई जिंकतेय अन् बंगळुरूत RCB ची वाट लागतेय! आले महत्त्वाचे अपडेट्स

IPL 2023, RCB vs GT Live : प्ले ऑफच्या चौथ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थेट लढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 18:51 IST

Open in App

IPL 2023, RCB vs GT Live : प्ले ऑफच्या चौथ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थेट लढत आहे. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवेल, असे चित्र आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MI ने १ बाद १४२ धावा चोपल्या आहेत. पण, तेच दुसरीकडे विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न भंगण्याचे चित्र दिसतेय... बंगळुरूत अवकाळी पावसाने तांडव केला आहे आणि त्यामुळेच हा सामना होईल की नाही, याबाबत संभ्रमच आहे.. हा सामना न झाल्यास आणि मुंबईने बाजी मारल्यास रोहित शर्माचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल.

आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. असा परिस्थितीत आरसीबीचे १४ सामन्यांमधून १५ गुण होतील. तर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं तर मुंबईचे १६ गुण होतील आणि मुंबईचा संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल. पावसामुळे राजस्थान रॉयल्सची अपेक्षाही संपुष्टात येईल. राजस्थानचे १४ सामन्यांमधून १४ गुण झालेले आहेत. जर मुंबई आणि आरसीबी आज पराभूत झाले तरच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची अंधुकशी संधी असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ एक सामना पावसामुळे रद्द झाला आगे. चेन्नई आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता.

आयपीएलने दिलेल्या अपडेट्सनुसार अजूनही पाऊस सुरू असून नाणेफेकीला विलंब लागणार आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्स
Open in App