Join us  

IPL 2023, RCB vs DC Live : डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 9:55 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली. फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर यांनी अवघ्या ४.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. पण, या सामन्यात RCBच्या डावातील १९व्या षटकात दिनेश कार्तिक आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात खटके उडालेले दिसले. वॉर्नर RCBच्या फलंदाजाच्या कृतीवर नाराज दिसला अन् त्याने अम्पायरला लक्ष घालण्यास सांगितले.

RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने १२व्या षटकात फॅफ ( ४५) आणि ग्लेन मॅक्सवल ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले. मुकेश कुमारने १६व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेतली. किंग कोहली ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावांवर झेलबाद झाला. विराट व महिपाल यांनी ३२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. केदार जाधवला आज संधी दिली, परंतु दिनेश कार्तिकला फलंदाजीला पुढे पाठवले गेले. महिपालला त्याची चांगली साथ मिळाली. महिपालने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक ११ धावांवर वॉर्नरच्या हाती झेलबाद झाला. महिपाल २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. RCB ने ४ बाद १८१ धावा केल्या. 

१९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर महिपालचा फटका चूकला अन् चेंडू तिथल्या तिथे राहिला. मात्र, कार्तिक नॉन स्ट्राईक एंडवरून धाव घेण्यासाठी पळाला होता. त्याला रिटर्न जाण्यास सांगितले आणि मुकेश कुमार चेंडू घेऊन कार्तिकला रन आऊट करण्यासाठी थ्रो करताना दिसला. कार्तिकने परत जाताना स्टम्पच्या रेषेत पळाला अन् त्यामुळे मुकेशला नेम साधता आला नाही. ऑबस्ट्रॅक्ट दी फिल्ड नियमानुसार कार्तिकला खरं तर बाद द्यायला हवं होतं. पण, तसं घडले नाही. वॉर्नर आणि कार्तिक यांच्यात त्यानंतर इशाऱ्यांमध्ये नाराजीचा संवाद झाला.  

टॅग्स :आयपीएल २०२३दिनेश कार्तिकडेव्हिड वॉर्नररॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App