मुंबईविरूद्धच्या सामन्यात गुजरातचं पारड जड, कारण...; विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत

MI vs GT : फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:50 PM2023-05-25T19:50:55+5:302023-05-25T19:51:39+5:30

whatsapp join usJoin us
 IPL 2023 Qualifier 2 GT vs mi will be dominated by Gujarat Titans, says former Australia captain Aaron Finch | मुंबईविरूद्धच्या सामन्यात गुजरातचं पारड जड, कारण...; विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत

मुंबईविरूद्धच्या सामन्यात गुजरातचं पारड जड, कारण...; विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.

क्वालिफाय २ मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यातील विजयी संघ फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करेल. GT vs MI या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने एक भाकीत केले आहे. मुंबईविरूद्ध गतविजेत्या गुजरातचे पारडे जड असल्याचे फिंचने म्हटले आहे. फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०१५चा विश्वचषक जिंकला होता. 

विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत 
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना फिंचने म्हटले, "गुजरातच्या ताफ्यात राशिद खानसारखा 'वर्ल्ड क्लास' गोलंदाज आहे. तसेच हार्दिक पांड्याने संपूर्ण हंगामात सर्व गोलंदाजांचा योग्य वापर केला आहे. त्यामुळे मुंबईला पराभूत करण्यासाठी जीटी हा एक मजबूत संघ आहे. मला वाटते की, क्वालिफाय २ मध्ये गुजरातच्या संघाचे पारडे जड असेल." 

"चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

मुंबईची फायनलकडे कूच
मुंबईने लखनौच्या नवाबांचा पराभव करून फायनलकडे कूच केली आहे. काल झालेल्या सामन्यात फलंदाजीसाठी कठीण वाटत असलेल्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांनी साजेशी खेळी केली. कॅमेरून ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने (३३) धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात हातभार लावला. १८३ धावांचा बचाव करताना मुंबईने चमकदार कामगिरी केली. युवा आकाश मधवालने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

  
 

Web Title:  IPL 2023 Qualifier 2 GT vs mi will be dominated by Gujarat Titans, says former Australia captain Aaron Finch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.