IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्ससाठी पुन्हा एकदा  ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने चांगली खेळी केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:13 PM2023-05-23T21:13:20+5:302023-05-23T21:18:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ruturaj Gaikwad 60 ( 44), Devon Conway 40 ( 34), Chennai Super Kings 172/7 | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्ससाठी पुन्हा एकदा  ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने चांगली खेळी केली. ऋतुराजच्या वेगाला आज कॉनवे मॅच करू शकला नाही. ऋतुराजची विकेट पडल्यानंतर गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेतली. त्यामुळे CSK बॅकफूटवर गेले होते आणि पाच षटकं त्यांना चौकारही मारता आला नव्हता. अंबाती रायुडूने धावा वाढवण्याचा केलेला प्रयत्नही यशस्वी नाही झाला. MS Dhoni शेवटची दोन षटकं असताना मैदानावर आला अन् चेपॉक दणाणून निघाले. 


गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज आणि कॉनवे या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. ऋतुराजची दुसऱ्या षटकात विकेट पडली होती, परंतु No Ball असल्याने गुजरात टायटन्सला विकेट मिळाली नाही. ऋतुराज व कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ऋतुराजने ३६ चेंडूंत यंदाच्या पर्वातील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे सावध खेळ करत होता, तर ऋतुराज बहरदार फटकेबाजी करताना दिसला. ११व्या षटकात ८७ धावांवर CSKला धक्का बसला. ऋतुराजचा फटका चुकल्याने चेंडू हवेत उडाला अन् डेव्हिड मिरलने सोपा झेल घेतला. ऋतुराज ४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर माघारी परतला. 


ऋतुराज व कॉवने यांनी यंदाच्या पर्वात ७५७+ धावांची भागीदारी केली आहे आणि ही CSK कडून एका पर्वातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०२१मध्ये फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज यांनी ७५६ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेच्या जागी CSK ने शिवम दुबेला ( १) पुढे पाठवले, परंतु नूर अहमदने त्याची काठी काढली. ( पाहा दुबेची विकेट ) या विकेटनंतर जवळपास पाच षटकं CSKला चौकार मारता आलेला नव्हता. कॉनवेवर धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी होती. अजिंक्यने फटके मारून वातावरण तयार केले, परंतु दर्शनच्या चेंडूवर तो ( १७) झेलबाद झाला. दर्शनच्या ४ षटकांत ४४ धावा आल्या. पुढच्याच षटकात कॉनवे ( ४०) शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. ( CSK vs GT Live Scoreboard मराठीत

ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला

धावा करायच्या की पर्यावरणासाठी 'डॉट' बॉल खेळायचा? TATA,  BCCIचा भन्नाट उपक्रम 

 


अंबाती रायुडूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आज ६००० धावांचा टप्पा ओलांडला, पण तो ९ चेंडूंत १७ धावा करून झेलबाद झाला. महेंद्रसिंग धोनी मैदानावरच येताच स्टेडियम दणाणून निघाले. पण, मोहित शर्माने १९व्या षटकात धोनीला ( १) चतुराईने बाद केलं अन् स्मशान शांतता पसरली. रवींद्र जडेजाने २०व्या षटकाची सुरूवात चौकाराने केली आणि त्याला मोईन अलीनेही षटकार खेचून साथ दिली. चेन्नईला ७ बाद १७२ धावा केल्या. जडेजा २२ धावांवर बाद झाला. 

 

Web Title: IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ruturaj Gaikwad 60 ( 44), Devon Conway 40 ( 34), Chennai Super Kings 172/7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.