Join us

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, CSKची चाल त्यांच्यावरच उलटली

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:06 IST

Open in App

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल... गुजरातने यंदाच्या पर्वात निर्विवाद वर्चस्व गाजवताना २० गुणांच्या कमाईसह टेबल टॉपरपर्यंत मजल मारली, तर चेन्नईने चढउतारांचा प्रवास करून १७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यंदाच्या पर्वात घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळतोय आणि त्यामुळे चेन्नईचं चेपॉक स्टेडियम पुन्हा एकदा धोनीमय दिसेल, यात शंका नाही. अशात गुजरातसमोर CSKला घरी हरवण्याचं आव्हान पेलावं लागेल.

आजच्या सामन्यात रवींद्र जडेजा विरुद्ध हार्दिक पांड्या असाही सामना पाहायला मिळेल.. चार इनिंग्जमध्ये जडेजाने दोनवेळ हार्दिकला बाद केले आहे. मोहम्मद शमी हा चेन्नईच्या सलामीवीरांसाठी धोक्याची घंटा असेल... त्याने कॉनवेला यापूर्वी दोनवेळा बाद केले आहे, तर ऋतुराज गायकवाडला शमीविरुद्ध काही खास कामगिरी करता आलेली नाही.  पण, चेन्नईने चेपॉकवर ६३ पैकी ४४ सामन्यांत विजय मिळवला आहे आणि हा त्यांचा प्लस पॉईंट आहे.  गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेची निवड केली. CSKलाही प्रथम गोलंदाजी करायची होती, असे धोनीने सांगितले. CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल नाही. गुजरातचा संघ धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करतोय, असे धोनी म्हणाला आणि त्यामुळे त्याला त्यांना प्रथम फलंदाजी द्यायची होती. पण, टॉस हरल्याने हा प्लान फसला.   

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App