IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : आयपीएल २०२३ मध्ये घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने कमाल केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK आणखी एक आयपीएल फायनल खेळणार आहे. चारवेळच्या विजेत्या CSK ने चेपॉकवर झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. MS Dhoniच्या नावाने चेपॉक स्टेडियम दणाणून निघाले होते आणि त्याच्या कल्पन नेतृत्वाने GT हतबल झालेले पाहायला मिळाले. चेपॉकच्या प्रेक्षकांनीही आपल्या लाडक्या खेळाडूचा व संघाचा प्रोत्साहन वाढवण्याची कोणतीच कसर ठेवली नाही. चेन्नईने सर्वाधिक १० वेळा आयपीएल फायनल गाठली.
CSKच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना वृद्धीमान साहा (१२) आणि हार्दिक पांड्या ( ८) यांना पॉवर प्लेमध्येच माघारी पाठवले. फॉर्मात असलेल्या विजय शंकरला मागे ठेवून गुजरातने दासून शनाकाला ( १७) पुढे पाठवले, परंतु त्यानेही काहीच कमाल नाही केली. रवींद्र जडेजाने ११व्या षटकात शनाकाला आणि नंतर डेव्हिड मिलरचा ( ४) त्रिफळा उडवून गुजरातला मोठा धक्का दिला. त्याने ४-०-१८-२ अशी स्पेल टाकली. धोनीने त्यानंतर चहरला पुन्हा गोलंदाजीला आणले अन् त्याने शुबमनची ( ४२) विकेट मिळवून दिली. राहुल तेवातिया व विजय शंकर यांच्यावर आता जबाबदारी होती. पण, तीक्षणाने अप्रतिम चेंडूवर तेवातियाचा ( ३) दांडा उडवला. तीक्षणा ४-०-२८-२ आणि चहरने ४-०-२९-२ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.
( CSK vs GT Live Scoreboard मराठीत)
शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला
मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले
रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज परतले माघारी
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( ६०) आणि डेव्हॉन कॉनवे ( ४०) यांनी ८७ धावांची भागीदारी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. पण, ऋतुराजच्या विकेटनंतर गुजरातच्या गोलंदाजांनी पुनरागमन करताना शिवम दुबे, अजिंक्य रहाणे या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. अंबाती रायुडू ( १७) व रवींद्र जडेजा ( २२) यांनी शेवटच्या षटकात सुरेख फटके मारताना ७ बाद १७२ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. महेंद्रसिंग धोनी १८व्या षटकात आला आणि चेपॉकवर जल्लोष झाला, परंतु त्याला १ धावेवर माघारी जाताना पाहून स्मशान शांतता पसरली होती.