Join us

IPL 2023 Points Table: धोनीचा CSK अव्वल, विराटच्या RCBचीही मोठी झेप; पाहा कोणता संघ कितव्या स्थानी?

रविवारच्या दोन सामन्यात कोलकाता आणि राजस्थानचा पराभव झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 08:16 IST

Open in App

IPL 2023 Points Table, CSK RCB: च्या शनिवार-रविवारच्या सामन्यांमध्ये अनेक दमदार क्षण पाहायला मिळाले. रविवारी प्रथम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) विजय मिळवला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग तिसऱ्या विजयासह आपली विजयी लय कायम ठेवली. या निकालांनी पॉइंट टेबलमध्ये चांगलीच उलथापालथ झाली आणि CSKला त्याचा सर्वात मोठा फायदा झाला.

रविवारी मोठ्या धावसंख्येचे सामने रंगले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुरुवात केली आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थाननेही जोरदार प्रयत्न केले पण 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. ईडन गार्डन्सवर धावांचा खरा जम बसला. तिथे चेन्नईने या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या २३५ धावा केली. पण केकेआरचा प्रयत्न फसला आणि त्यांचा 49 धावांनी पराभूत झाला.

CSK गुणतालिकेत अव्वल

गेल्या मोसमात 14 सामन्यांत केवळ 4 सामने जिंकून नवव्या स्थानावर असलेल्या चेन्नईने यावेळी केवळ 7 सामन्यांत 5 विजय मिळवले आहेत. चेन्नई या मोसमात पाच सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. अशा प्रकारे चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले केले आहे. याआधी सीएसके तिसर्‍या स्थानावर होता, पण आता राजस्थानचे अव्वल स्थान त्यांनी काबीज केले आहे. दुसरीकडे, बंगलोरनेही सलग दुसऱ्या विजयासह पाचवे स्थान पटकावले आहे. या संघाचे 7 सामन्यांत 8 गुण आहेत. यापूर्वीही बंगळुरू पाचव्या स्थानावर होता पण पंजाब किंग्जने मुंबईला हरवून त्यांच्याकडून हे स्थान हिसकावून घेतले होते.

आज कोणाचा नंबर?

आता सोमवारच्या सामन्यांवर सर्वांचे लक्ष असेल. 24 एप्रिल रोजी होणारा सामना अशा दोन संघांमध्ये आहे, जे गुणतालिकेत तळाशी आहेत. सनरायझर्स हैदराबादसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल. हैदराबादने आतापर्यंत 6 सामन्यांत केवळ 2 विजय नोंदवले असून ते नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पहिले पाच सामने गमावलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आपले खाते उघडले असले तरी ते शेवटच्या स्थानावर आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App