Join us

IPL 2023 : मोहम्मद सिराजचे Live सामन्यात डोकं फिरले, सहकाऱ्याला दिली शिवी; नंतर ड्रेसिंग रुममध्ये मागितली माफी, Video 

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 16:54 IST

Open in App

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली. RCBचा हा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चौथा विजय ठरला. RCB ने १८९ धावा केल्या आणि RRच्या फलंदाजांची फौज पाहता ते या धावांचा बचाव करू शकतील असे वाटत नव्हते. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात जॉस बटलरला माघारी पाठवले, परंतु यशस्वी जैस्वाल व देवदत्त पडिक्कल यांनी ९८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. 

पण, हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर RRची धावगती मंदावली आणि त्यांना ११ ते १४ षटकांत केवळ १६ धावाच करता आल्या. ध्रुव जुरेल व संजू सॅमसन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु RRने विकेट गमावल्या. शेवटच्या चार षटकांत RRला १५च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. मोहम्मद सिराजने त्याच्या शेवटच्या षटकात १३ धावा दिल्या. १२ चेंडूंत ३३ धावांची गरज असताना सिराजला गोलंदाजी दिली गेली.  

शिमरोन हेटमायरच्या विकेटने RRच्या हातून सामना गेला होता. जुरेल व आर अश्विन यांनी खिंड लढवली. सिराजने चार चेंडूंत पाच धावा दिल्या होत्या आणि जुरेलने त्याला षटकार खेचला. शेवटच्या चेंडूवर जुरेलने लाँग ऑनच्या दिशेने चेंडू टोलावला अन् अश्विनने दोन धावांसाठी कॉल दिला... महिपाल लोम्रोरने चेंडू लगेच थ्रो केला अन् सिराजने तो कलेक्ट करून यष्टींना लावला. पण, त्यावेळी महिपालने चेंडू संथ गतीने फेकल्यामुळे सिराजने त्याला शिवी दिली. पण, अश्विनची विकेट मिळाल्यानंतर तो शांत झाला.   सामन्यानंतर सिराजने ड्रेसिंग रुममध्ये महिपालची माफी मागितली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मोहम्मद सिराजरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App