Join us  

मागच्या वर्षी आम्ही RCBवर उपकार केले होते, आता आशा करतो...! रोहित शर्मा  

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 8:07 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना कॅमेरून ग्रीन व रोहित शर्मा यांनी १२८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ग्रीनने ४७ चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. त्याने शतकी धाव घेताना मुंबईला १८ षटकांत विजय मिळवून दिला. ग्रीन व सूर्यकुमार यादव ( २५) यांनी नाबाद ५३ धावांची भागीदारी केली. मुंबईने १८ षटकांत २ बाद २०१ धावा केल्या. पण, मुंबईचे भवितव्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळावर अवलंबून आहे आणि सामन्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) मागील पर्वात केलेल्या उपकाराची आठवण करून दिली.

इशान किशन ( १४) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी  दमदार फटकेबाजी केली. रोहितचे दोन झेल सोडने सनरायझर्स हैदराबादला महागात पडले. रोहित व ग्रीनची ६५ चेंडूंतील १२५ धावांची भागीदारी १४व्या षटकात संपुष्टात आली. ३७ धावांत ५६ धावांवर रोहित माघारी परतला. तत्पूर्वी, विवरांत शर्माने ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या आणि त्याने मयांकसह पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावा जोडल्या. मयांक ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. आकाश मढवालने १९व्या षटकात क्लासेनचा ( १८) व हॅरी ब्रुक ( ०) यांना सलग दोन चेंडूंत दांडा उडवला आणि चार विकेट्स घेतल्या. हैदराबादने ५ बाद २०० धावा केल्या. 

मुंबई इंडियन्सला 'चौथी' सीट? कॅमेरून ग्रीनचे शतक अन् SRHवर दणदणीत विजय, पण...

हिटमॅनचा सुपर शो! एकाच षटकात केले २ मोठे रेकॉर्ड; मुंबईसाठी कुठल्या ५ हजार धावा

रोहित शर्मा म्हणाला,''आम्ही जिंकण्याच्या मानसिकतेसह आलो आणि दुसरीकडे काय होईल याची चिंता केली नाही. आमच्या हातात जे आहे त्यावरच आमचे नियंत्रण आहे. मग प्ले ऑफमध्ये जाऊ किंवा नाही, याचं श्रेय किंवा टीका या आमच्याच कामगिरीमुळे असतील. त्यामुळे दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहायचे नसते.  गेल्या वर्षी आम्ही आरसीबीवर उपकार केला होता. आम्हाला आशा आहे की तेथील निकाल आमच्या बाजूने असेल. ( हसत हसत) आम्ही चांगली सुरुवात केली नाही, जर मला मागे वळून पाहायचे असेल तर, आम्ही महत्त्वपूर्ण क्षण गमावले. पंजाब विरुद्ध मुंबईत आणि शेवटचा सामना LSG विरुद्ध गमावला. आम्ही त्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. ''

मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवून RCBचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित केला होता. 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App